एव्हिएशन ते रिअल इस्टेट,काय आहेत यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज संसदेत ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यस्थेला बसलेला फटका आणि सामान्य करदात्यांच्या खिशाला लागलेली कात्री हे महत्वाचे फॅक्टर लक्षात घेता सितारामन आजच्या अर्थसंकल्पात भारतीय उद्योगजगत आणि सामान्य करदात्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत काय सवलती देणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत.

ADVERTISEMENT

एव्हिएशन सेक्टरला काय आहेत अपेक्षा??

लॉकडाउनच्या काळात भारतातल्या एव्हिएशन सेक्टरला खूप मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात या क्षेत्राला करसवलतीसोबत अन्य सवलतींचीही अपेक्षा आहे.

हे वाचलं का?

रिएल इस्टेट –

२०२० मध्ये लॉकडाउन काळात रिएल इस्टेट क्षेत्रासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा रिएल इस्टेट सेक्टर केंद्र सरकारची स्वस्त घरांची योजना अधिक विस्तार होईल अशी अपेक्षा करतंय. घर विकत घेणाऱ्या ग्राहकांनाही याचा फायदा मिळावा यासाठीचे प्रयत्नही रिएल इस्टेट क्षेत्राकडून सुरु आहेत.

ADVERTISEMENT

ऑटोमोबाईल क्षेत्र –

ADVERTISEMENT

इतर क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल सेक्टरलाही लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला पण लॉकडाउन नंतरच्या काळात चांगलं पुनरागमन केलं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सामान्यांना वाहन खरेदीसाठी सुलभ कर्ज किंवा सवलती देण्याची अपेक्षा ऑटोमोबाईल सेक्टर करतंय.

डिफेन्स सेक्टर –

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरच्या संघर्षामुळे संरक्षण क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पातून बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत. सीमेवर चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबतचा संघर्ष पाहता यंदा अर्थसंकल्पात या क्षेत्रालाही भरघोस तरतूद मिळेल अशी आशा आहे.

आरोग्य व्यवस्था –

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लॉकडाउन काळात आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी विशेष तरतुदी होण्याची शक्यता आहे. भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर फार्मासुटीकल्स क्षेत्राला प्राधान्य देऊन आर्थिक चालना देण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

याव्यतिरीक्त लॉकडाउन काळात देशातील अनेक सामान्य व्यक्तींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसेच स्थानिक पातळीवर छोटे-मोठे व्यापारीही या आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे या अर्थसंकल्पात निर्मला सितारामन या वर्गालाही करसवलतीसोबत नवीन नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल ठोस तरतूद करतील अशी आशा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT