एग्जिट पोल

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, “भाजपचा हात धरून सत्तेत आलात तेव्हा….”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? असाही प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला होता. याच टीकेला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे नारायण राणे यांनी?

महाराष्ट्रात ८५ टक्के पेक्षा जास्त साक्षरता आहे. उद्धव ठाकरेंचं बुलढाणा येथील भाषण माझ्याकडे आहे. ते म्हणाले की भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत. त्यांच्यासोबत अनेक वर्षे संसार केला ना? अनेक वर्षे भाजप तुमच्यासोबत होता ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं नाव वापरून मोठे झालात ना? भाजपचा हात धरून सत्तेत आलात ना? असे प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत.

तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते सांगा

तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते सांगा. कोरोनाच्या औषध खरेदीत किती चोरी केली? किती खोके, पेट्या औषधांमध्ये गेल्या? असाही प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. माझ्याकडे कंपन्यांचा पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहे कोण किती टक्के मागत होते हे मला माहित आहे. औषधांच्या अभावी अनेक माणसं मेली, त्यावेळी हे टक्के मागत होते असाही आरोप नारायण राणेंनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचं योगदान काय?

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी जी आंदोलनं झाली त्यात त्यांचं काय योगदान आहे? मराठी माणसासाठी यांनी कुठलं आंदोलन केलं? हे मला दाखवा. कधी भागही घेतला नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना वीर सावरकरांबाबत सन्मान आहे का?

उद्धव ठाकरेंना वीर सावरकरांबाबत सन्मान आहे का? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारलं. राहुल गांधींनी वीर सावरकर यांचा अपमान केला आणि आदित्य ठाकरेंनी त्यांना मिठी मारली. कानात वेल डन म्हटलं असेल असंच मला वाटतं आहे. तो पिल्लू आहे काहीही बडबड करू शकतो. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. आता कितीही माफी मागितली तरीही उपयोग नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेले. आता उद्योग राज्याबाहेर गेले त्यासाठी आम्हाला दोष देत आहेत. एकदा मला सांगा की या कंपन्यांशी चर्चा कोण करत होतं? उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे. दीड वर्षांपासून बोलत होते तरीही हे प्रकल्प बाहेर का गेले? याचा विचार करा.. असंही नारायण राणेंनी सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT