UPSC Civil Services Final Result 2021: नागरी सेवा परीक्षेत मुलींचाच डंका, अंतिम निकाल जाहीर
UPSC Civil Services Final Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात श्रुती शर्मा ही अव्वल ठरली आहे. यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मा तर अंकिता अग्रवाल दुसऱ्या […]
ADVERTISEMENT

UPSC Civil Services Final Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात श्रुती शर्मा ही अव्वल ठरली आहे.
यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मा तर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर चौथा क्रमांक ऐश्वर्या वर्मा हिने पटकावला आहे. उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर आहे. तर आठवा क्रमांक इशिता राठी, नववा क्रमांक प्रीतम कुमार आणि दहावा क्रमांक हरकिरत सिंग रंधावाला यांनी पटकावला आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षा देतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. आयोगाने 5 एप्रिल ते 26 मे दरम्यान मुलाखती घेतल्या होत्या. ज्यानंतर आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021 असा पाहता येईल: