Varsha Gaikwad : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वर्षा गायकवाड हजर होत्या. शिक्षणमंत्र्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना चाचण्या करण्याचं आवाहन केलं आहे. (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad tests positive)

ADVERTISEMENT

मुंबईसह राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत आहे. मागील काही दिवसात राज्यात तिप्पटीने रुग्णवाढ झाली असून, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Covid 19 : महाराष्ट्रात 1426 नव्या रूग्णांचं निदान, 21 मृत्यूंची नोंद

हे वाचलं का?

वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. काल (27 डिसेंबर) सायंकाळी लक्षणं जाणवल्याने चाचणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळालं. मला सौम्य लक्षणं आहेत. सध्या प्रकृती चांगली असून, स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Omicron: महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 26 रूग्ण, कोरोनाने वाढवलं टेन्शन

ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशनात होत्या हजर

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असून, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली. हिवाळी अधिवेशनादरम्यान कोरोनाचा संसर्ग होणार नाही, विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येणाऱ्या सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. मात्र, आता हिवाळी अधिवेशनाला हजर असलेल्या वर्षा गायकवाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

वर्षा गायकवाड यांना गेल्या वर्षीही झाला होता कोरोना

वर्षा गायकवाड यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेतही संसर्ग झाला होता. सप्टेंबर 2020 मध्ये वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. संसर्ग झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT