वाह रे पठ्या! सातारच्या वेदांत नांगरेचा अमेरिकेत डंका!

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: अमेरिका (USA) येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे या 22 वर्षीय पठ्यानं सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, नियोजन, परिश्रम , त्याग, योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर वेदांत या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकला. (vedant nangre from satara became the youngest indian ultraman in america)

ADVERTISEMENT

सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत तरुण भारतीय अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे.

 

हे वाचलं का?

karnataka election 2023 date: कर्नाटकात बिगुल वाजला! 13 मे रोजी ‘निकाल’

अमेरिकेत पार पडलेली अल्ट्रामॅन स्पर्धा नेमकी कशी असते?

अल्ट्रामॅन स्पर्धा ही तीन दिवसांची खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायची असते. दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर सायकलिंग करायची असते. तर तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायची असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12 तासाच्या आत पूर्ण करायचे असते. वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसात एकूण 33 तास 46 मिनिटं लागली.

UPI Charges : एप्रिलपासून ‘युपीआय’वरील व्यवहार महागणार, किती मोजावे लागणार पैसे?

सातारच्या पठ्याचे अथक परिश्रम, मिळाली यशाची जोड!

वेदांत नांगरेला 10 डिग्री थंड तापमानामधून सलग साडेचार तास त्याला पोहावे लागले. तसंच सायकलिंग आणि रनिंगसाठी थंड वातावरणातून, वाऱ्यातून तसेच कठीण अशा चढ-उतारावरून त्याला अंतर पूर्ण करावे लागले.

ADVERTISEMENT

या स्पर्धेत स्पर्धकाला सपोर्टसाठी त्याच्या पुढे किंवा मागे कारसह क्रू मेंबरची गरज असते. जे आपल्या स्पर्धकाला योग्य कॅलारीचे खाणे देणे, रस्ता दाखविणे या प्रकारची मदत करतात. यावेळी वेदांत बरोबर त्याची आई सौ.कल्याणी नांगरे आणि वडील अभय नांगरे हे क्रू मेंबर्स होते. याखेरीज अमेरिकेतील हवाई येथील या स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले क्रू म्हणून बिली रिकार्ड्स हे होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी लाभले.

ADVERTISEMENT

पुण्याचे खासदार गिरीश बापटांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यावर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोनवरून अभिनंदन केले. सध्या वेदांतचं विशेष विशेष कौतुक होत आहे. ते व्हायलाही हवं कारण त्याची कामगिरीच तशी आहे. विजयानंतर अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला.
भारतामधून अमेरिकेत येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्याने भारतीय म्हणून वेदांतचा खूप अभिमान आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

याआधी वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे यशस्वी पूर्ण केली. अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण अशी समजली जाते .

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT