कासिफ खानचा व्हीडिओ पोस्ट करत नवाब मलिक यांचा नवा आरोप, म्हणाले…
FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर कासिफ खान आणि समीर […]
ADVERTISEMENT

FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर कासिफ खान आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत हे दोघेही एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखतात म्हणूनच त्याने पार्टी आयोजित करूनही त्याला अटक झाली नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केला व्हीडिओ
Video of Kashif khan dancing on the Cruise ship pic.twitter.com/JoSsYF9Ux1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
‘कासीफ खान कोण आहे, याचा जरा शोध घ्या. तो फॅशन टीव्हीचा भारतातील प्रमुख आहे. त्याचं सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट, पॉर्नोग्राफी ही सगळी कामं तो करतो. त्या दिवशी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 1300 लोकांचा तपास झाला नाही. रेव्ह पार्टी होणार याची माहिती एक महिना आधीपासून होती. रेव्ह पार्टीचा आयोजक ज्याची पार्श्वभूमी ड्रग्ज व्यापाराशी संबंधित आहे याचा तपास होत नाही. क्रूझवर झाडाझडती होत नाही. त्यांना ताब्यात घेतलं जात नाही. म्हणजेच त्यांचे सबंध आहेत’, असा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला.











