Inside Story : अमित शाहांचा मध्यरात्री दौरा अन् दुपारी विजय रुपाणींनी दिला राजीनामा
विजय रुपाणी यांनी अचानक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तराखंड, कर्नाटकानंतर भाजपने गुजरातमध्ये नेतृत्वात बदल केला असून, रुपाणींच्या राजीनाम्या अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रात्रीतून दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यानंतरच रुपाणींनी राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. […]
ADVERTISEMENT

विजय रुपाणी यांनी अचानक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तराखंड, कर्नाटकानंतर भाजपने गुजरातमध्ये नेतृत्वात बदल केला असून, रुपाणींच्या राजीनाम्या अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रात्रीतून दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यानंतरच रुपाणींनी राजीनामा दिला.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. असं असतानाही राजीनामा द्यावा लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. राजीनामा दिल्यानंतर आता अमित शाह यांनी मध्यरात्री गुजरातचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेतृत्व बदलाच्या संदर्भात गुजरातचा दौरा केला होता. अमित शाह शुक्रवारी मध्यरात्री अचानक गुजरातला गेले होते. तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली.
अनेक तास चाललेल्या या बैठकीतच विजय रुपाणींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं निश्चित झालं होतं. मात्र, हा निर्णय पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. त्यामुळे याबद्दल कुणालाही अंदाज लावता आला नाही. रात्रीतून बैठक करून अमित शाह सकाळीच दिल्लीत परतले होते.










