Viral Love Letter : महिलेने बॉयफ्रेंडचं 18 वर्ष जुनं Love लेटर केलं शेअर, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

An old love letter from 18 years ago went viral on social media
An old love letter from 18 years ago went viral on social media
social share
google news

आजच्या काळातील व्हॉट्सअॅप’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘स्नॅपचॅट’च्या पिढीला जुन्या काळातील प्रेमपत्रांची जादू कदाचित कधीच लक्षात येणार नाही. पण ज्यांनी प्रेम पत्रांची ही जादू अनुभवली आहे, त्यांना त्यातील आतुरता, सौंदर्य या गोष्टी आजही आठवल्या तरी अंगावर शहारे उभे राहतात. आधी लिहिलं जाणारं पत्र, ते 4 दिवसांनी पोहचणे, त्यावर 4 दिवसांनी उत्तर येणं हा किमान 10 दिवसांचा वेळ एका पत्राला जायाचा. म्हणूनच आजही अनेकांनी त्यांची जुनी प्रेमपत्र जपून ठेवली आहेत. (An old love letter from 18 years ago went viral on social media)

ADVERTISEMENT

असंच एका महिलेने तिच्या प्रियकराने लिहिलेले 18 वर्ष जुने प्रेम पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पत्र आता ते इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. हे पत्र वाचून अनेक लोकं जुन्या जमान्यात गेले आहेत. तर अनेकांनी मुलाच्या लिखाणाचही कौतुक केले आहे.

हे वाचलं का?

साई स्वरूपा नावाच्या एका महिलेने हे पत्र पोस्ट केलं आणि म्हटलं की, “काल मी काही जुन्या गोष्टी साफ करत होतो, तेव्हा मला 18.5 वर्षांपूर्वीची काही पत्रे सापडली. अय्यर यांनी स्वत:च्या हाताने हे माझ्यासाठी लिहिले होते. पण तपशीलवार आकृत्यांसह प्रयोगशाळेतील प्रयोगांबद्दल त्याच्या मैत्रिणीला कोण पत्र लिहितो?”

Video: दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल, अन् प्रवाशांची उडाली तारांबळ

पुढे साई स्वरुपा म्हणाल्या, होय, मी या माणसाला हो म्हणाले होते. आज साई स्वरुपा आणि त्यांना पत्र लिहिणारा मुलगा दोघेही सोबत असून दोघेही खूश आणि सुखी आहेत. या पत्रात हिंदीत एक ओळ लिहिली आहे – हम तो लुट गए खड़े ही खड़े…। त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोकांनी या प्रेमपत्राचे खूप कौतुक केले. आजच्या जगात हा आनंद कुठे आहे, असे काहींनी लिहिले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT