…आणि डोंबिवलीच्या भिंती बोलू लागल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या भिंती म्हणजे रंग उडून त्यावर साचलेली धूळ, ठिकठिकाणी साचलेला कचरा असेच काहीसे चित्र शहरात दिसून येते. याच रुक्ष भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

हे वाचलं का?

शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे. यासाठी शाळांतील चित्रकलेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

ADVERTISEMENT

कल्याण-डोंबिवली शहरात आता मोठमोठी गृहसंकुल तयार होत आहेत. आतून ही गृहसंकुल कितीही सुसज्ज असली तरीही बाहेर रस्त्यावरील भिंती या भकास दिसायच्या. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

ADVERTISEMENT

क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव मोठं करणाऱ्या सर्व महान खेळाडूंची चित्र यावेळी भिंतीवर काढली आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपकदाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राचं चित्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं चित्र…कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा गड मानला जातो.

ठाकुर्ली ९० फुट रोड आणि इतर भागांत साकारण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

या उपक्रमामुळे डोंबिवली शहरातील या भिंतींना एक वेगळंच रुप आलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारताना एक कलाकार

गुढीपाडव्याच्या निमीत्ताने निघणारी शोभायात्रा हा डोंबिवली शहरातला आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यांचं प्रतिकही या भिंतीवर काढण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT