फ्री फायर मोबाइल गेमच्या माध्यमातून आधी ओळख, त्यानंतर बदलापूरच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे बदलापुरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाशी फ्री फायर मोबाईल गेमच्या आधारे ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने बहाण्याने बोलवून तिचे अपहरण करून पश्चिम बंगाल गाठले. मात्र, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने 48 तासातच त्या अपहरणकर्त्याला बेड्या ठोकून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुखरूप […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
ADVERTISEMENT
बदलापुरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाशी फ्री फायर मोबाईल गेमच्या आधारे ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने बहाण्याने बोलवून तिचे अपहरण करून पश्चिम बंगाल गाठले. मात्र, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने 48 तासातच त्या अपहरणकर्त्याला बेड्या ठोकून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आहे. एसके रोज उर्फ एसके बुध्दू (वय 22, रा. मालदा, पश्चिम बंगाल) असे अपहरण प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
दोन वर्षापासून सुरू होते प्रेमसंबध
हे वाचलं का?
लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या कालावधीत सोशल मीडियासह विविध मोबाईल गेम खेळताना प्रेमाचे सुत जुळलं. अनेक तरुण तरुणीचे जीवन उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच बदलापूर शहरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे मूळचा पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणाशी तो केरळमधील ए.सी.सी. सिमेंट कंपनीत कामाला असताना फ्री फायर मोबाईल गेमच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले. तेव्हापासून दोघेही वांरवार मोबाईलवर संपर्क ठेवून होते. त्यानंतर पीडितेशी प्रेमसंबंध असल्याचा बहाणा करून त्याने तिचे अपहरण केलं.
जालना: जिल्हा रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाचं अपहरण, खोटं कारण सांगत आरोपी महिलेने साधला डाव
ADVERTISEMENT
मोबाईल नंबरवरून पटली आरोपीची ओळख
ADVERTISEMENT
पीडित मुलीचे 8 फेब्रुवारीला अपहरण झाल्याची तक्रार नातेवाईकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल करताच घटनेचे गांभीर्य ओळखून बदलापूर पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने संमातर तपास सुरू केला असता. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, पोहवा ज्ञानेश्वर महाजन, पाटील, रमेश केंजळे, गोणश गावडे, संजय शेरमाळे, या पथकाला अपहरण करणारा संशयित व्यक्तीची मिळाली होती. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल लोकेशनवरून तांत्रीक विश्लेषण केले असता, आरोपी तरुण हा ८ फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित तरुणीसोबत दिसून आला. विशेष म्हणजे पीडित मुलीला त्याने बहाण्याने कल्याण येथून बोलावून तिचे अपहरण केल्याचे समोर आले.
Crime: मामी-भाच्याचे अनैतिक संबंध, भाच्याने केली मामाची निर्घृण हत्या
पीडित मुलीला आरोपी तरुण कल्याण स्थानकात घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. तसेच त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारे रेल्वे तिकीटचा तक्ता पाहून, पी.एन.आर. नंबरद्वारे रेल्वे रेर्नेव्हशनची तपासणी केली असता कर्मभुमी एक्सप्रेसमधून पीडितेला घेऊन पश्चिम बंगालमध्ये गेल्याची खात्रीशीर माहिती समजले. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हावडा येथील डानकुणी रेल्वे स्थनकातील आरपीएफ पोलीस अधिकारीशी संपर्क करून त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. तसेच पीडित आणि अपहरण करणाऱ्या आरोपीचे फोटो पाठवून ते कोणत्या डब्यातुन प्रवास करीत आहेत त्याचीही माहिती त्यांना दिली.आरपीएफ पोलिसांनी आरोपीचे तिकट, पी.एन.आर.नंबर पाहून तसेच त्याचे फोटो पाहून डानकुणी रेल्वे स्थनकातच कर्मभुमी एक्सप्रेसमधून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर उल्हानसागर गुन्हे शाखेचे पथक आणि पीडित मुलीचे नातेवाईक पश्चिम बंगालच्या डानकुणी रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर आरोपीला अटक करून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुखरुप सुटका करून तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT