कुणाच्या चुकीमुळे विनायक मेटेंना गमवावा लागला जीव?; फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात मृत्यू झाला. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केलं. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीद्वारे विनायक मेटे […]
ADVERTISEMENT
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात मृत्यू झाला. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केलं.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीद्वारे विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं.
विनायक मेटेंची पत्नी अधिकारी, तर मुलं घेताहेत शिक्षण; असं आहे शिवसंग्रामच्या नेत्याचं कुटुंब
हे वाचलं का?
विनायक मेटेंच्या अपघाताबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“आपल्या सगळ्यांचे परममित्र आणि या राज्याच्या सामाजिक-राजकीय वाटचालीत महत्त्वाचा वाटा असलेले विनायक मेटे यांचा अतिशय दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः त्यांच्यासोबतच्या अनेक कार्यकर्त्यांनी, सामाजिक नेत्यांनी निर्माण केलेत. त्यांच्या पत्नी ज्योती मेटे सुद्धा मला बोलल्या आणि त्यांनीही काही विषय निदर्शनास आणून दिलेत. एकूणच ही घटना बघितली, तर विशेषतः ज्यावेळी ते रात्री किंवा पहाटे येत होते.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, विनायक मेटेंचा अपघात कसा झाला?
“असं लक्षात येतंय की एक मोठा ट्रॉलर आहे. हा ट्रॉलर शेवटच्या लेनमधून चालणं आवश्यक होतं, तो ट्रॉलर मधल्या लेनमधून चालत असल्यानं त्यांच्या चालकाला (विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक) ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे त्याने काही काळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो तिसऱ्या लेनमध्ये गेला. तिसऱ्या लेनमधून त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तिथेही समोर एक वाहन चाललं होतं.”
ADVERTISEMENT
विनायक मेटेंच्या अपघाताला वेगळं वळण, व्हायरल फोन क्लिपमुळे खळबळ; चौकशीची ज्योती मेटेंची मागणी
ADVERTISEMENT
“या दोन वाहनांच्या मध्ये थोडीशी जागा होती. त्या जागेतून गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्याने (विनायक मेटे यांच्या चालकाने) केला. तो निर्णय अतिशय चुकीचा होता, कारण तेव्हढी जागा त्या ठिकाणी नव्हती आणि चालकाच्या बाजूने नव्हे, तर विनायक मेटे आणि सुरक्षा रक्षक ज्या बाजूने बसलेले होते. त्याच बाजूने जबर धक्का किंवा धडक बसली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मेटेंचा मृत्यू कधी झाला, हे अहवाल आल्यानंतरच सांगता येईल -देवेंद्र फडणवीस
“डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला असेल, पण यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर नक्की सांगता येईल. अजित पवार, मी (देवेंद्र फडणवीस)आणि मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) गेलो तेव्हा तिथले डॉक्टर असं सांगत होते की, त्यांचा जागवेरच मृत्यू झाला असावा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT