ब्लॉग: दो दिल मिल रहै हैं, चुपके-चुपके…

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल नेहमी सांगतात की, बाळासाहेब हे त्यांचे राजकीय विरोधक होते पण राजकीय शत्रू नव्हते. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये. अशी भूमिका त्यांनी अनेक लोकांबद्दल घेतली. शरद पवार यांचं नेहमी म्हणणं असतं की, प्रमोद महाजन असतील किंवा बाळासाहेब असतील हे माझे राजकीय विरोधक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल नेहमी सांगतात की, बाळासाहेब हे त्यांचे राजकीय विरोधक होते पण राजकीय शत्रू नव्हते. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये. अशी भूमिका त्यांनी अनेक लोकांबद्दल घेतली. शरद पवार यांचं नेहमी म्हणणं असतं की, प्रमोद महाजन असतील किंवा बाळासाहेब असतील हे माझे राजकीय विरोधक होते पण शत्रू नव्हते. पण महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आपण जे बघतोय ते पाहता आता या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे.

ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे दोन मंत्री यांना अटक झालीए, विविध नेत्यांवर इतर तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरु आहे. यातून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी असा आरोप केला आहे की, भाजप हे द्वेषाचं राजकारण करत आहे. भाजप बदल्याचं राजकारण करत आहे आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीचे आरोप महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून केले जात आहेत.

दुसरीकडे भाजपने सुद्धा एक स्टिंग ऑपरेशन करुन हा आरोप लावण्याचा प्रयत्न केला आहे की, भाजपच्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपांमध्ये गुंतविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं हेच आहे की, आकसाचं राजकारण सुरु आहे. पण या पार्श्वभूमीवर एक संबंध पाहिला तर तो सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे.

हो.. जे तुमच्या मनात आहे तेच.. आपण इथे चर्चा करणार आहोत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांबद्दल. खरं तर या दोघांमधील नातं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला बुचकळ्यात पाडणारं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे राजकीय नाट्य घडलं. त्यामध्ये सगळ्यात न सुटलेला कोणता प्रश्न असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक जाऊन घेतलेली शपथ. त्यांचं सरकार काही फार टिकलं नाही. पण त्याच्यानंतर जे काही आपण बघतोय त्यातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अजूनही चांगले आहेत आणि महाविकास आघाडीवर एकामागून एक संकटं येत असताना सुद्धा अजित पवारांच्या प्रतिक्रिया या खरोखरच प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp