Sameer Wankhede : SC आरक्षणाचा गैरफायदा घेतल्यास काय होते कारवाई? समजून घ्या
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी scheduled caste मध्ये आहे दाखवत नोकरीत आरक्षण मिळवलं, असा आरोप केला आहे, प्रत्यक्षात वानखेडे हे मुस्लिम आहेत, त्यामुळे त्यांना SC कोट्याचा लाभ घेता येणार नाही, असा दावाही मलिकांनी केलाय. पण खरोखर समीर वानखेडे मुस्लिम आहेत, तर त्याने काय फरक पडतो? मुस्लिममध्ये दलित नसतात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी scheduled caste मध्ये आहे दाखवत नोकरीत आरक्षण मिळवलं, असा आरोप केला आहे, प्रत्यक्षात वानखेडे हे मुस्लिम आहेत, त्यामुळे त्यांना SC कोट्याचा लाभ घेता येणार नाही, असा दावाही मलिकांनी केलाय. पण खरोखर समीर वानखेडे मुस्लिम आहेत, तर त्याने काय फरक पडतो? मुस्लिममध्ये दलित नसतात का? दलित मुस्लिम असलेल्यांना नोकरीत आरक्षण मिळतं की नाही? हे समजून घ्या.
1. मुस्लिमांमध्ये दलित असतात का?
भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, भारताचं संविधानही तेच सांगतं. संविधानातील मुलभूत अधिकारांमध्ये धर्माचं स्वातंत्र्य देण्यात आलंय. म्हणजेच एखादी व्यक्ती तिला हवा तो धर्म स्वीकारू शकते, हवा त्या धर्माचा प्रचार-प्रसार करू शकते. पण नवाब मलिक यांनी सांगितलंय की वानखेडेंच्या धर्माशी मला काही घेणं-देणं नाही पण त्यांनी चुकीच्या मार्गाने नोकरीत आरक्षण लाटण्यावर आक्षेप आहे.
शिक्षण आणि नोकरीत काही वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद ही संविधानातच करण्यात आली आहे. सरकारी नोकरीत शेड्युल कास्ट म्हणजेच अनुसूचित जातींना 15 टक्के आरक्षण मिळतं. संविधानातील शेड्युल कास्ट ऑर्डर 1950 नुसार हे आरक्षण देण्यात येतं.









