Bank बुडाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशांचं काय होतं? जाणून घ्या भारतातील नियम
अमेरिकेतील बँकिंग संकट आणि त्याचा अमेरिकेसह युरोपमध्ये झालेला परिणाम हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) बुडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. पण या बँका बुडाल्यानंतर बँकांच्या ग्राहकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे त्यांच्या पैशांचे काय होणार? त्यांचे पैसे परत मिळणार का? मिळाले तर किती मिळणार? आणि कधी […]
ADVERTISEMENT

अमेरिकेतील बँकिंग संकट आणि त्याचा अमेरिकेसह युरोपमध्ये झालेला परिणाम हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) बुडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. पण या बँका बुडाल्यानंतर बँकांच्या ग्राहकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे त्यांच्या पैशांचे काय होणार? त्यांचे पैसे परत मिळणार का? मिळाले तर किती मिळणार? आणि कधी मिळणार?
अमेरिकी नियामक आणि सरकार या दोघांकडूनही ग्राहकांच्या पैसे परत मिळण्याबाबत खात्री देण्यात आली आहे. पण हे पैसे कधी आणि कसे परत मिळणार? याचं मात्र उत्तर कोणाकडे नाही. भारतातही (India) मागील काही काळात अशा अनेक बँका बुडाल्याच्या किंवा दिवाळखोरीत निघाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे बँका बुडाल्यानंतर पैशांचे काय? हा प्रश्न भारतीय खातेधारकांच्या मनातही तयार होतो. (What happens to customers’ money when a bank collapses)
अमेरिकेत बँक बुडाल्यानंतर काय आहे नियम?
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँका बंद झाल्यानंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत मिळतील असं आश्वासन दिलं आहे. पण जर आपण FDIC च्या नियमांवर नजर टाकली तर, अमेरिकेत, बँक बुडल्यास ठेवीदारांना बँकेत 2.5 लाख डॉलरपर्यंतचा ठेव विमा मिळतो. म्हणजेच, ग्राहकांना त्यांच्या एकूण ठेवीपैकी 2.5 लाख डॉलरपर्यंतची रक्कम हमखास मिळू शकते.
भारतातील खातेधारकांना एवढी रक्कम मिळते :
भारतातही, बँक बुडाल्यास ग्राहकांसाठी ठेव विम्याची सुविधा 60 च्या दशकापासून तरतुद आहे. देशातील ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर विमा संरक्षण प्रदान करते. 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी, भारतातील बँक ठेवींवर ठेव विमा फक्त 1 लाख रुपये होता. म्हणजे तुमच्या बँकेत ठेवी जरी 10 लाखांपेक्षा जास्त असली तरी बँक बंद पडली किंवा बुडली तर तुम्हाला फक्त 1 लाखापर्यंतची रक्कम परत मिळायची.









