जगभरातले युवक शांतपणे का सोडत आहेत नोकरी? काय आहे Quiet Quitting ट्रेंड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

जगभरातल्या कार्यालयांमध्ये एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड आहे Quiet Quitting अर्थात तुम्ही तुमचं काम करत असताना अगदी शांतपणे नोकरी सोडणं. पण हा झाला शब्दशः अर्थ. या ट्रेंडनुसार जगभरातले कर्मचारी तेवढंच काम करत आहेत जेवढा पगार त्यांना मिळतोय आणि नोकरी टिकवण्यासाठी जे आवश्यक आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये द ग्रेट रेझिगनेशनचा ट्रेंडही येऊन गेला. यातून सावरल्यानंतर आता हा नवा ट्रेंड आला आहे. Quiet Quitting या ट्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहे.

द ग्रेट रेझिगनेशनचा ट्रेंड काय होता?

द ग्रेट रेझिगनेशनच्या ट्रेंड अंतर्गत जगभरातले लाखो कर्मचारी त्यांच्या कार्यालयीन वातवरणामुले, वरिष्ठांच्या आणि बॉसेसच्या भूमिकांमुळे जॉब सोडण्यास सुरूवात केली म्हणजेच राजीनामा देण्यास सुरूवात केली. २०२१ मध्ये अमेरिकेत एका महिन्यात ४० लाख लोकांनी आपली नोकरी सोडली होती. ब्रिटनसारख्या देशांमध्ये आजही २० टक्के कर्मचारी असे आहेत जे आपली सुरू असलेली नोकरी सोडू इच्छित आहेत मात्र त्यांना दुसऱ्या ठिकाणी संधी मिळाली नाही किंवा ते स्वतःचा बिझनेस करू शकत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने नोकरी करत आहेत. Quiet Quitting चा ट्रेंड हेच सांगतो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Quiet Quitting चा ट्रेंड काय आहे?

जे कर्मचारी नोकरी सोडू शकत नाहीत ते आता Quiet Quitting चा ट्रेंड आजमावत आहेत. यामध्ये लोक नोकरी सोडत नाहीत पण तेवढंच काम करतात जेवढं काम नोकरी टिकण्यासाठी आवश्यक आहे तेवढंच काम कर्मचारी करत आहेत. अतिरिक्त कुठलंही काम करत नाहीत. आपल्या वाट्याला आलेलं काम शांतपणे करायचं आणि शांत राहायचं. हा ट्रेंड युवकांमध्ये जास्त लोकप्रिय झाला आहे. जगभरातल्या नोकरदार तरूणांचं हे म्हणणं आहे की नोकरीच सर्वस्व नाही. त्याशिवायही आयुष्य असतं आणि ते आम्हाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त काम करणं हे तरूण पसंत करत नाहीत. गरजेपुरतंच काम करतात आणि स्वतःला वेळ देणं पसंत करतात.

ADVERTISEMENT

तरूण आपल्या नोकरीबाबत खुश नाहीत

हा जो नवा ट्रेंड आला तो एके काळच्या समजुतीपेक्षा एकदम विरूद्ध आहे. तुम्हाला नोकरीत चांगलं काम केलं पाहिजे, मेहनत करायला हवी, जबाबदारी घ्यायला हवी आपल्या जोरावर करिअर केलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे या सगळ्याच्या बरोबर उलट हा ट्रेंड आहे. या वर्षीच प्रकाशित झालेल्या Deloitte च्या सर्व्हेमध्ये असं सांगितलं गेलं की मिलेनियल्स म्हणजेच १९८१ नंतर ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांचं वय आज घडीला २५ ते ४० या टप्प्यात आहे. तसंच ती पिढी जी १९९७ नंतर जन्माला आली आहे आजच्या घडीला २४ वर्षे वय आहे. त्यांना सगळ्यांना वाटत होतं की २०२२ मध्ये म्हणजेच कोरोना काळ संपल्यानंतर सगळं काही नीट आणि व्यवस्थित होईल. मात्र आत्ताही जगभरातले तरूण नोकरीत खुश नाहीत.

ADVERTISEMENT

जेवढा मोठा पगार तेवढे भरमसाठ खर्च

जगातल्या ४६ देशांमधल्या २३ हजार युवकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. त्यात हे समजलं आहे की ३२ टक्के युवकांना महागाईची चिंता सतावते आहे. घरखर्च, प्रवासखर्च आणि जीवनावश्यक वस्तू या महाग झाल्या आहेत त्यामुळे हे युवक चिंतित आहेत. ४७ टक्के युवक हे मानतात की आम्हाला पगार भरपूर आहे पण आमचा खर्चही भरपूर आहे. एखादी इमर्जन्सी आली तर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. २९ टक्के युवकांना वाटत नाही की आपण कुठल्याही चिंतेशिवाय निवृत्त होऊ. ४५ टक्के युवकांना असं वाटतं की कामाच्या ताणामुळे आपण बर्न आऊट झालो आहोत. ४४ टक्के युवकांनी सांगितलं की मागच्या काही महिन्यात आलेल्या कामाच्या प्रचंड ताणामुळे आम्ही नोकरी सोडली आहे. ही नोकरी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता या मुलांनी सोडली आहे.

सगळं काही रामभरोसे

Quiet Quitting हा ट्रेंड ज्यांनी अंगिकारला आहे ते किमान नोकरी तरी करत आहेत. मात्र चीनच्या युवकांमध्ये एक असा ट्रेंड आला आहे. लेट इट रॉट असं या ट्रेंडचं नाव आहे. या ट्रेंडच्या अंतर्गत युवक आपली नोकरी, आपली स्वप्नं, आपली लाइफस्टाईल सगळं सोडून देतात. या युवकांचं म्हणणं आहे की स्वप्न पाहतो आहोत मात्र ती पूर्ण होणार नाहीत. घरं महाग झाली आहेत, कार खरेदी कऱणं आटोक्याच्या बाहेर आहे, रोजचे खर्चही वाढले आहेत. अशात लोक सारं काही देवाच्या भरवशावर सोडून मोकळे होत आहेत. चीनमध्ये हा ट्रेंड वाढल्याचं दिसून आलं आहे.

भारतातही हा ट्रेंड कसा आला आहे?

Quiet Quitting हा ट्रेंड भारतातही आला आहे. सध्याच्या घडीला ४५ टक्के तरूण असे आहेत ज्यांना ७ ते १० टक्क्यांच्या प्रमाणात पगारवाढ मिळाली आहे. मात्र अर्ध्याहून जास्त कर्मचारी असे आहेत ज्यांना घर आणि नोकरी यांच्यात ताळमेळ ठेवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. कमी काम, कमी जबाबदारी या सगळ्याच्या बदल्यात जास्त पगार असा ट्रेंड भारतात रूळतोय असं CIEL चे मिश्रा यांनी सांगितलं. बिझनेस टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT