समजून घ्या : सिरो सर्व्हे म्हणजे काय? तो कसा करतात आणि त्याचा फायदा काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधातल्या अँटीबॉडीज असल्याचं नुकतंच BMC च्या सिरो सर्व्हेमध्ये समोर आलं….गेल्या वर्षभरातही आपण अनेक सिरो सर्व्हे पाहतोय, ज्यात वेगवेगळ्या भागात किती लोकांमध्ये अँटीबॉडीज असल्याची आकडेवारी जाहीर केली जाते…पण हा सिरो सर्व्हे नेमका असतो तरी काय? तो कसा मोजला जातात? त्याचं महत्व किती? सिरो सर्व्हेच्या आकडेवारीवरून सरकार काय करतं? या गोष्टी आज समजून घेऊयात…

सगळ्यात पहिले समजून घ्या, की सिरो सर्व्हे नेमका असतो तरी काय? त्याचा अर्थ काय?

सिरोलॉजी चाचणी करून हा सर्व्हे केला जातो. यात तुमच्या रक्ताचे नमुने घेतले जातात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरीरात शिरतो, तेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती त्या व्हायरसविरोधात अँटीबॉडीज बनवते. या अँटीबॉडीज आपल्या रक्तात राहतात. जेव्हा सिरो सर्व्हेसाठी एलिसा अँटीबॉडी किटने तुमच्या रक्ताचे नमुने घेतले जातात, त्याच्यात कळतं की तुमच्या रक्तात या व्हायरसविरोधात अँटीबॉडीज आहेत की नाहीत?.

जर तुमच्या रक्तात अँटीबॉडीज मिळाल्या तर त्याचा अर्थ अलिकडच्याच काळात तुम्हाला त्या व्हायरसची लागण होऊन गेलीये.

ADVERTISEMENT

ज्या भागात सिरो सर्व्हे केला जातो, तिथे लोकसंख्येच्या तुलनेत अशाप्रकारे किती लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्यात, याचं प्रमाण सिरो सर्व्हेमध्ये काढलं जातं

ADVERTISEMENT

समजून घ्या : तुम्हाला मिळणारी Corona Vaccine खरी की बोगस? कसं ओळखायचं?

हा सिरो सर्व्हे केला कसा जातो? त्याचे काही निष्कर्ष आहेत का?

जसे इतर सर्वे करताना एक सॅम्पल घेतलं जातं, तसंच सिरो सर्व्हे करण्यासाठी पण सॅम्पल घेतले जातात. म्हणजेच सर्व्हे करायचाय म्हणून तो काही सरसकट अख्ख्या शहरात होत नाही. त्यासाठी विशिष्ट ग्रूप, वयोगट निश्चित केला जातो. देशात आतापर्यंत अनेक सिरो सर्व्हे झाले आहेत. ज्यात वेगवेगळे वयोगट होते, झोपडपट्टी किंवा इमारती अशीही वर्गवारी होती, कंटेन्मेंट झोन-नॉन कंटेन्मेंट झोन, सर्वसामान्य-आरोग्य कर्मचारी की फ्रंटलाईन वर्कर्स असे वेगवेगळ्या प्रकारात सर्व्हे करण्यात आले आहेत.

देशव्यापी तिसरा सिरो सर्व्हे जेव्हा करण्यात आला, तेव्हा 28 हजार लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता, हे सगळे जण 18 वर्षांवरील होते. यावेळी सिरो सर्व्हेचं प्रमाण हे 21.5 टक्के आलेलं. म्हणजेच 28 हजार लोकांमध्ये 21.5 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधातल्या अँटीबॉडीज तयार झालेल्या.

या सिरो सर्व्हेचा फायदा काय?

सर्व्हेतून हे समजतं की किती लोकांमध्ये व्हायरसविरोधातल्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ज्या लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत, ती लोकं संसर्ग पसरवण्याचं प्रमाण कमी असतं, कारण व्हायरस त्यांच्या शरीरात शिरल्यावर अँटीबॉडीजमुळे तो मारला जातो. आणि त्यामुळे त्याचा पुढे संसर्ग होत नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सगळ्यात जास्त धोका असं काही जण म्हणतायत…त्यामुळेच कशाप्रकारे आपल्याला उपयायजोना करायला हव्या, कुठल्या भागात लहान मुलांच्या अनुषंगाने जास्त तयारी करण्याची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने सिरो सर्व्हे केला. ज्यात 50 टक्क्याहून अधिक लहान मुलांमध्ये अंटीबॉडीज तयार झाल्याचं समोर आलं.

आता या माहितीमुळे मुंबई महापालिकेला तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लहान मुलांसाठी पुढील उपाययोजना कशाप्रकारे करायला हव्या, तशी तयारी करता येईल.

समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

पण याची शाश्वती किती? एका सर्व्हेवर किती निर्भर राहायचं?

सिरो सर्व्हेवर आपण 100 टक्के निर्भर नाही राहू शकत. कारण तयार झालेल्या अँटीबॉडीज संपूही शकतात. शिवाय सिरो सर्व्हेमध्ये एक विशिष्ट ग्रूप घेतला जातो, आणि त्यांच्यावरच सर्वेक्षण केलं जातं, पण दुसऱ्या वेळी त्याच भागात सर्वेक्षण करताना, त्याच ग्रूपवर सर्व्हे होईल असं नसतं. म्हणून एकाच भागात दोनदा सर्वे केल्यानंतर वेगवेगळे निष्कर्ष निघू शकतात.

उदाहरणाखातर आपण मुंबईतलं धारावी पकडू. धारावीमध्ये जुलै 2020 मध्ये जेव्हा सिरो सर्व्हे करण्यात आला, तेव्हा तो 57 टक्के होता. पण तोच जेव्हा एप्रिल 2021 मध्ये करण्यात आला, तेव्हा हे प्रमाण 41 टक्क्यावर घसरलेलं. म्हणजेच 9 महिन्यात झोपडपट्टी भागात 57 टक्के लोकांमध्ये असलेल्या अँटीबॉडीजचं प्रमाण 41 टक्क्यावर घसरलं.

ह्यामागे दोन कारणं असू शकतात. एक की दोन सर्व्हे वेगवेगळ्या ग्रूपवर केलेले असू शकतात. किंवा जुलै 2020 मध्ये ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज सापडल्या त्या आता घटल्या असणार.

मानवी शरीरात दोन प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. एक असते IgM आणि दुसरी असते IgG. यातील दुसऱ्या प्रकारची जी अँटीबॉडी आहे IgG ती रक्तात अनेक महिने राहते, ज्यामुळे आधी त्या व्यक्तीला व्हायरसने इंफेक्शन होऊन गेलंय का, हे ओळखता येतं. सिरो सर्व्हेमध्ये याच अँटीबॉडीवरून तपासलं जातं की अमूक-अमूक व्यक्तीला संसर्ग होऊन गेलाय की नाही.

याच्याशिवाय आपल्या शरीरात मेमरी सेल्स असतात. एकदा आपल्या शरीरात व्हायरसविरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या, आणि त्या संपल्या जरी, तरी या मेमरी सेल्सना पुन्हा अशा अँटीबॉडीज कशा बनवायच्या हे माहिती असतं. त्यामुळे पुन्हा तोच व्हायरस शरीरात शिरला तर मेमरी सेल्समुळे अँटीबॉडीज नव्याने तयार होतात.

समजून घ्या : कोरोना लसीचे ‘कॉकटेल’ डोस म्हणजे काय?

भारतात आतापर्यंत देशव्यापी किती सर्व्हे झाले, आणि त्यातून काय समोर आलं, ते सुद्धा जाणून घेऊ.

ICMR ने मे 2020 मध्ये सगळ्यात पहिले सिरो सर्व्हे केला, ज्यामध्ये 0.73 टक्केच लोकांमध्ये अँटीबॉडीज असल्याचं निष्पन्न झालं. 21 राज्यात 18 वर्षांवरील 4 गटामध्ये हा सर्व्हे झाला.

दुसरा आणि तिसरा सर्व्हेही अशाचप्रकारे झाला, फक्त वयोगट 18 वरून 10 वर आणलेला. दुसरा सर्व्हे ऑगस्ट 2020 तर तिसरा सर्व्हे ड़िसेंबर 2020 मध्ये झाला. दुसऱ्या सर्व्हेमध्ये 6.6 टक्के तर तिसऱ्या सर्व्हेमध्ये 21.4 टक्के लोक व्हायरसला एक्स्पोज झाल्याचं कळलं.

पण जसं आपण मगाशी म्हणालो, की एकाच सर्व्हेवर 100 टक्के विसंबून राहून चालणार नाही, कारण एकाच ग्रूपनुसार आपण संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज बांधू नाही शकत. म्हणूनच थोड्या-थोड्या फरकाने हे सिरो सर्व्हे पुन्हा केले जात आहेत. त्यानुसारच ICMR आता चौथ्यांदा देशव्यापी सिरो सर्व्हे करणार आहे.

याशिवाय विविध संस्था आणि महापालिकाही आपापल्या स्तरावर सिरो सर्व्हे करून त्याअनुषंगाने पुढील उपयायोजनांचं प्लॅनिंग करत असतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT