ज्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होते आहे त्या अशोक स्तंभाचा इतिहास काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनातील भव्य अशोक स्तंभाचं सोमवारी अनावरण केलं. त्यानंतर ट्विटरवर एकच वाद सुरू झाला. अशोक स्तंभ ही आपल्या देशाची राजमुद्राही आहे. तसंच या अशोकस्तंभाला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या अशोक स्तंभात बदल केल्याचा आरोप सातत्याने केला जातो आहे. त्यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत. आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत अशोकस्तंभाचा इतिहास.

ADVERTISEMENT

काय आहे अशोक स्तंभाचा (Ashok Stambh) इतिहास?

कोणताही देश म्हटला की त्या देशाची एक राजमुद्रा किंवा राष्ट्र प्रतीक असतं. भारत त्याला अपवाद नाही. सम्राट अशोकाने उभा केलेला अशोक स्तंभ हा भारताची राजमुद्रा आहे. संपूर्ण जगात भारताच्या इतिहासाची चर्चा होते. कारण भारत हा गौरवशाली इतिहास लाभलेला एक देश आहे. या इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे ते अशोक स्तंभाचं. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारताने अशोक स्तंभ ही आपल्या देशाची राजमुद्रा असेल हे निश्चित केलं. कारण अशोक स्तंभ हे संस्कृती, शासन आणि शांततेचं सर्वात मोठं प्रतीक आहे.

अशोक स्तंभाचा इतिहास मात्र शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. इसवी सन पूर्व २७३ मध्ये आपल्याला त्यासाठी डोकवावं लागेल. हा असा काळ होता ज्या काळात भारतात मौर्य राजे राजे राज्य करत होते. सम्राट अशोक हा त्यांच्यापैकीच एक. सम्राट अशोक हा त्याच्या काळातला सर्वात क्रूर शासक मानला जात असे. मात्र कलिंगाचं युद्ध झालं त्या युद्धात जो रक्तपात आणि नरसंहार सम्राट अशोकाने पाहिला त्याचा सम्राट अशोकाच्या मनावर गहिरा परिणाम झाला. ज्यानंतर सम्राट अशोकाने राज्य त्यागलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला.

हे वाचलं का?

बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सम्राट अशोकाने देशभरात या धर्माची प्रतीकं तयार केली. त्यातलं महत्त्वाचं प्रतीक होतं ते चार दिशांना गर्जना करणाऱ्या चार सिंहाचं. चार सिंह असलेला हा स्तंभ सम्राट अशोकाने उभारला. त्यामुळेच या स्तंभाला अशोक स्तंभ असं म्हटलं जातं. भगवान बुद्ध यांना सिंहाचं रूप मानलं जातं. त्यांच्या अनेक नावांपैकी शाक्य सिंह, नरसिंह ही काही उदाहरणं देता येतील.

एवढंच नाही तर सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला त्या उपदेशाला सिंह गर्जना म्हटलं गेलं आहे. त्यामुळेच अशोक स्तंभावर असेलल्या चार सिंहांच्या प्रतीकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भारताने हेच प्रतीक आपली राजमुद्रा म्हणून स्वातंत्र्यानंतर स्वीकारलं आहे.

ADVERTISEMENT

नव्या संसदेतील अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी का ठरत आहेत टीकेचे धनी?

ADVERTISEMENT

अशोक स्तंभावर चार सिंह पण तीनच का दिसतात?

अशोक स्तंभावर चार दिशांना पाहणारे चार सिंह आहेत. मात्र जेव्हाही आपण हा अशोक स्तंभ पाहतो आपल्याला फक्त तीन सिंह दिसतात. अशोक स्तंभ गोलाकार असल्याने आणि चार सिंह चार दिशांना असल्याने कुठल्याही दिशेने समोरून पाहताना आपल्याला त्यातले तीनच सिंह दिसतात. अशोक स्तंभ जर बारकाईने पाहिला तर एका बैलाची आकृती आणि एका घोड्याची आकृतीही या स्तंभाच्या खालच्या भागात पाहण्यास मिळते. एवढंच नाही तर या दोन आकृतींच्य मधे एक चक्रही आहे ज्याला अशोक चक्र असं संबोधलं जातं. हे अशोक चक्र आपल्या राष्ट्रीय ध्वजावरही पाहण्यास मिळतं. अशोक स्तंभावर लिहिलेला संदेशही अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आहे सत्यमेव जयते. अर्थात सत्याचा कायम विजय होतो.

अशोक स्तंभाबाबत नियम काय आहेत?

अशोक स्तंभाचा इतिहास हा रोचक आहेच. शिवाय याबाबत काही नियम आणि कायदेही आहेत. अशोक स्तंभ हा आपली राजमुद्रा आहे. त्यामुळे या प्रतीकाचा उपयोग फक्त घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींनाच करता येतो. ज्यामध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल, न्यायाधीश, सरकारी संस्थांमध्ये काम करणारे उच्चपदस्थ अधिकारी यांचा त्यात समावेश आहे.

या सेवांमध्ये कार्यरत असणारे लोक जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना हे प्रतीक वापरण्याचा अधिकार उरत नाही. राजमुद्रेचा गैरवापर झाला तर शिक्षेचीही तरतूद करण्यात आलेली आहे. जर एखाद्या अधिकार नसलेल्या माणसाने अशोकस्तंभाचा वापर केला तर त्याला दोन वर्षांचा कारावास आणि ५ हजारापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. आपल्या कायद्यात घटनेनुसार तशी तरतूद करण्यात आली आहे.

नव्या अशोकस्तंभावर काय आहे आक्षेप?

नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे पूर्वीच्या स्तंभावरील सिंहांपेक्षा आक्रमक आणि लढण्याच्या पवित्र्यात आहेत असं दाखवण्यात आलं आहे.

राष्ट्रीय प्रतीक बदललं गेलं आहे, मोदींच्या मनाप्रमाणे हा अशोकस्तंभ घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

अशोकस्तंभाचं अनावरण करण्याच्या कार्यक्रमात एकाही विरोधकाला निमंत्रित करण्यात आलं नाही

राष्ट्रीय प्रतीकात बदल करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये हा प्रश्नही विरोधक विचारत आहेत

ट्विटरवरही नव्या अशोकस्तंभाची चर्चा

दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाकाय अशोकस्तंभाचे शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे असे दोघंजण आहेत हे दोघंही महाराष्ट्रातल्या औरंगाबादचे आहेत. या अशोक स्तंभातची उंची २६ फूट आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर असलेले सुनील देवधर यांनी आत्तापर्यंत अनेक शिल्पं साकारली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT