फॉक्सकॉनमुळे चर्चेत आलेला सेमीकंडक्टर म्हणजे काय? वाचा सविस्तर बातमी

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून सध्या वाद सुरू आहेत. हा प्रोजेक्ट म्हणजे भारताचं सिलिकॉन व्हॅली बनण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे, असं वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले. पण, ज्यावरून इतके आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या प्रोजेक्टमध्ये तयार होणारं सेमीकंडक्टर म्हणजे काय? त्याचा उपयोग काय? आणि त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात घेणार आहोत.

ADVERTISEMENT

सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय?

सध्या सेमीकंडक्टर चीपच्या वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टची चर्चा आहे. त्यामुळे तुम्ही सेमीकंडक्टर हा शब्द वारंवार ऐकला असेल. पण, हे समीकंडक्टर म्हणजे नेमकं काय असतं? तर सेमीकंडक्टर एक विशिष्ट प्रकारचं सबस्टन्स असून ते कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधला भाग आहे. विद्युत प्रवाह असणारं कंडक्टर आणि विद्युत प्रवाह नसणारं सबस्टन्स म्हणजे इन्सुलेटर…या दोन्हीच्या मधला भाग म्हणजे सेमीकंडक्टर असतो. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये इलेक्ट्रीक करंट कंट्रोल आणि मॅनेज करण्याचं काम या सेमीकंडक्टर चीप करतात. हे सेमीकंडक्टर सिलिकॉन, जर्मेनिअम, गॅलेलिअम अर्सेनाईड यासारख्या मटेरिअलपासून तयार केलं जातं. या मटेरिअलची कंडक्टीव्हीटी बदलून सेमीकंडक्टर तयार होते. त्या प्रक्रियेला डोपिंग म्हणतात.

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज ठाकरेही आक्रमक

हे वाचलं का?

सेमीकंडक्टरचा नेमका उपयोग काय?

हे झालं सेमीकंडक्टर…पण, या सेमीकंडक्टरचा उपयोग नेमका काय आहे? सेमीकंडक्टर हा आपल्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे, असं म्हटलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, असं समजा की, या जगात इलेक्ट्रॉनिक उपकरणच नाहीत. स्मार्टफोन, रेडीओ, टीव्ही, कम्पुटर्स, व्हिडिओ गेम्स, वैद्यकीय उपकरणं अशी कुठलीच साधनं नाहीत. याशिवाय आपले दैनंदिन काम शक्य आहेत का? तर नाही. आता तर आपल्याला स्मार्टफोनची इतकी सवय झालीय की उठता बसता झोपता आपण सारखा स्मार्टफोन वापरतो. इतकंच नाहीतर, या टेकनिकल युगात कम्पुटर्सचं किती महत्वं आहे, हे तर तुम्हाला वेगळं सांगायला नको. मूळ मुद्दा असा की या सर्व उपकरणाशिवाय आपण आपलं जग इमॅजिन करू शकत नाही, तसं या सेमीकंडक्टर चीपशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार होऊ शकत नाही.

सेमीकंडक्टरला मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सचा मेंदू

सेमीकंडक्टरला मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सचा मेंदू म्हटलं जातं. सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा अतिमहत्वाचा भाग आहे. आपल्या अवतीभवती सर्वच ठिकाणी सेमीकंडक्टर आहे. आपल्या कामासाठी वापरत असलेल्या कम्पुटर, मोबाईल फोन, कार, विमान, आजाराचं निदान करणारी उपकरणं, आपल्याला सुरक्षित ठेवणारं लष्करी यंत्रणा असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील.

ADVERTISEMENT

मोदींना काय अधिकार?; ‘वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट’वरून पृथ्वीराज चव्हाण संतापले

ADVERTISEMENT

सेमीकंडक्टर इतकं महत्वाचं असताना आपण ते दुसऱ्या देशातून आयात करतो. तैवान, चीन, साऊथ कोरिया, जापान या देशातून भारत सर्वाधिक सेमीकंडक्टर आयात करतो. तैवानची TSMC ही कंपनी सेमीकंडक्टर बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. या एकट्या कंपनीचा सेमीकंडक्टर बनवण्याता ५४ टक्के वाटा आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा ऑटोमोबाईलसह अनेक उद्यागांवर परिणाम झाला होता. असाच तुटवडा कधी निर्माण झाला तर पूर्ण आयटी इंडस्ट्रीसह अनेक उद्योग ठप्प पडण्याची भीती आहे. त्यामुळेच आता हे सेमीकंडक्टर आपल्याच देशात तयार व्हावं, यासाठी भारतातनं पावलं टाकली आहेत. वेदांता-फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर साठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या प्रकल्पामुळे सेमीकंडक्टर आयात कमी होईल आणि भारतातील उद्योगाला आणखी चालना मिळणार आहे. साहजिकच त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला अर्थव्यवस्थेवर होईल, असं जाणकार सांगतात.

ज्या राज्यात हा प्रकल्प होतोय त्या गुजरातला याचा सर्वाधिक फायदा होईल. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला गेल्यानं वाद सुरू आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT