WhatsApp वरील एक लिंक आणि अभिनेत्रीने मिनिटात गमावले २ लाख; नेमकं काय घडलं?
सोशल मीडिया आणि ऑनलाइन पेमेंट या दोन गोष्टी सध्या आपल्या जीवनाचा जणू काही अविभाज्य भागच बनल्या आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तसंच, स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी बहुतांश जण सोशल मीडिया आणि ऑनलाइन पेमेंट या सुविधा वापरतात. कोरोना कालखंडात या सुविधांच्या वापराला आणखी चालना मिळाली; मात्र त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढीला लागले आहेत. त्यामुळे […]
ADVERTISEMENT
सोशल मीडिया आणि ऑनलाइन पेमेंट या दोन गोष्टी सध्या आपल्या जीवनाचा जणू काही अविभाज्य भागच बनल्या आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तसंच, स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी बहुतांश जण सोशल मीडिया आणि ऑनलाइन पेमेंट या सुविधा वापरतात. कोरोना कालखंडात या सुविधांच्या वापराला आणखी चालना मिळाली; मात्र त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढीला लागले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
नुकतीच टेलिव्हिजन अभिनेत्री अमन संधूची 2 लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर शनिवारी गोरेगाव पोलिसात अज्ञात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. गोरेगाव पश्चिम येथे आईसोबत राहणाऱ्या संधूच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या आईसाठी ऑर्थोपेडिकची भेट घेण्यासाठी जुहू येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलची वेबसाइट शोधत होती. त्यावरून तिला व्हॉट्सअपवर एक लिंक आली आणि या लिंकवर क्लिक केल्यानं तिला २ लाख रूपयांचा भुर्दंड सोसाव लागला
हे वाचलं का?
अक्षरशः दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या आपल्याला ऐकायला/पाहायला मिळत असतात. त्यात आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणाऱ्या क्यूआर कोड घोटाळ्याची भर पडली आहे. अलीकडेच यातून काही जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, याबद्दल आपण माहिती घेऊ या, जेणेकरून स्वतःची फसवणूक टाळता येऊ शकेल.
ADVERTISEMENT
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. यात होतं असं, की एखाद्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या मालकाला काही ऑर्डर दिली जाते. त्यानंतर त्याला पैसे पाठवण्यासाठी एक क्यूआर कोड पाठवला जातो. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यास पैसे खात्यात जमा होतील, असं संबंधित दुकानमालकाला सांगण्यात येतं. त्यानंतर ती व्यक्ती तो क्यूआर कोड स्कॅन करते. त्यानंतर त्याला पैसे मिळण्याऐवजी त्याच्याच खात्यातून पैसे कापले जातात. थोडक्यात, त्या व्यक्तीकडून थेट खात्यात हात घालून चोरी केली जाते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचा हा सर्वात नवा प्रकार आहे.
ADVERTISEMENT
आता अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायचं, याची थोडी माहिती घेऊ या. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की क्यूआर कोडच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करणं अगदी सोपं झालं असलं, तरी त्यात सावधगिरी अत्यंत जरूरीची आहे. क्यूआर कोड स्कॅन करून एखाद्याला पैसे पाठवणं शक्य आहे; पण क्यूआर कोड स्कॅन करून पैसे स्वीकारणं म्हणजेच रिसीव्ह करणं शक्य नाही, ही तांत्रिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि कायम लक्षात ठेवली पाहिजे.
म्हणजेच समजा एखादी व्यक्ती तुम्हाला काही पैसे देणं लागते आणि ते पैसे तुम्हाला देण्यासाठी त्या व्यक्तीने तुम्हालाच क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी दिला, तर ती फसवणूक आहे, हे लक्षात घ्यावं. त्या व्यक्तीला पैसे खरंच पाठवायचे असतील, तर त्या व्यक्तीने तुमचा क्यूआर कोड स्कॅन करणं गरजेचं आहे. तरच त्याच्या खात्यातून पैसे तुम्हाला येतील. याउलट, त्या व्यक्तीने तुम्हालाच क्यूआर कोड स्कॅन करायला दिला, तर पैसे तुमच्याच खात्यातून कापले जाऊन त्या व्यक्तीच्या खात्यात जाणार, हे लक्षात घ्यावं. ही मूलभूत गोष्ट लक्षात घेतली, तर फसवणूक होण्याची शक्यताच नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन पेमेंट करताना किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यास ते पैसे नेमके कोणाला जात आहेत, याचीही खात्री करणं गरजेचं आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेला क्यूआर कोड स्कॅन करू नये. पुरेशी खात्री पटल्यानंतरच ऑनलाइन व्यवहार करावेत, असं आवाहन नेहमीच करण्यात येते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT