कोण आहेत Lt. Gen. Manoj Pande? जे होणार भारताचे नवे लष्करप्रमुख; काय आहे नागपूर कनेक्शन?
नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता भारताचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. काल याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मूळचे नागपूरचे असणारे मनोज पांडे हे 29 वे लष्करप्रमुख होणार असून ते या पदावर पोहोचणारे पहिले अभियंता (Engineer) असतील. आतापर्यंत फक्त इन्फंट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरी अधिकाऱ्यांनीच लष्करप्रमुख पद भूषवलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच एक इंजिनिअर […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता भारताचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. काल याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मूळचे नागपूरचे असणारे मनोज पांडे हे 29 वे लष्करप्रमुख होणार असून ते या पदावर पोहोचणारे पहिले अभियंता (Engineer) असतील. आतापर्यंत फक्त इन्फंट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरी अधिकाऱ्यांनीच लष्करप्रमुख पद भूषवलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच एक इंजिनिअर असलेला अधिकारी लष्करप्रमुख होणार आहे.
ADVERTISEMENT
लेफ्टनंट जनरल पांडे यांची 1 फेब्रुवारी 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत.
ADGPI ने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून नव्या लष्करप्रमुखांचे स्वागत केले आहे. लष्कराकडून सांगण्यात आले आहे की, 1 मे 2022 रोजी मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. विद्यमान लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांचा कार्यकाळ या महिन्याच्या 30 तारखेला संपणार आहे.
हे वाचलं का?
कोण आहेत लेफ्टनंट जनरल पांडे?
ADVERTISEMENT
नॅशनल डिफेन्स अकादमीचे (National Defence Academy) माजी विद्यार्थी, मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
लेफ्टनंट जनरल पांडे 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्त झाले होते. जम्मू आणि काश्मीरमधील ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान त्यांनी एलओसीवर इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. त्यांनी स्टाफ कॉलेज, यूके येथून पदवीचं शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी हायर कमांड आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमधूनही शिक्षण घेतले आहे.
General MM Naravane #COAS & All Ranks of #IndianArmy congratulate Lieutenant General Manoj Pande #VCOAS on being appointed as the 29th Chief of the Army Staff #COAS of the #IndianArmy. Lt Gen Manoj Pande will assume the appointment of #COAS on 01 May 2022.#InStrideWithTheFuture pic.twitter.com/fiUpc29U2A
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) April 18, 2022
आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. यासोबतच अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. त्यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील इन्फंट्री ब्रिगेड, पश्चिम लडाखमधील माउंटन डिव्हिजन, अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ तसेच पूर्व कमांडचे नेतृत्व केले आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रममध्ये एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जी कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये दहशतवाद्यांचा शस्त्रास्त्र पुरवठ्याचा संबंध उघड झाला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले. या कारवाईत देखील मनोज पांडे यांनी एका रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं.
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी इथिओपिया आणि इरिट्रिया येथे संयुक्त राष्ट्र मिशन अंतर्गत जनरल इंजिनियर म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे लष्करात काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे.
लष्करप्रमुख नरवणेंकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी, नवे CDS नियुक्त होईपर्यंत जुनी व्यवस्था लागू
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ सर्वच क्षेत्रात काम केले नाही तर दहशतवादाविरोधातही काम केले आहे. त्यांना दोन वेळा परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन आणि GOC-in-C कमेंडेशनने सन्मानित करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT