‘त्या’ व्हिडीओ प्रकरणात वादात सापडलेल्या शीतल म्हात्रे कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या वर्तुळात राजकीय गदारोळ माजलेला असतानाच, आणखी एक नवा वाद सुरू झाला आहे. हा वाद शितल म्हात्रेंबाबत आहे.

हे वाचलं का?

शीतल म्हात्रे यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होत्या. पण आता त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीतील हा व्हिडीओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे.

त्या व्हिडीओप्रकरणी राजकीय गदारोळात सापडलेल्या शीतल म्हात्रे कोण जाणून घेऊयात.

सध्या शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या शीतल म्हात्रे माजी नगरसेवक होत्या.

शीतल म्हात्रे यांच्या राजकीय कारकीर्दीला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर, 2012 मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या होत्या.

2012 आणि 2017 मध्ये त्यांनी दोन वेळा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.

याआधी त्या अलिबाग आणि पेणच्या शिवसेना संपर्कप्रमुख, दोनदा प्रभाग समिती अध्यक्ष, मुंबई मनपाच्या कायदा समितीच्या सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शीतल म्हात्रे त्यांच्या गटात प्रवेश केला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT