उपराष्ट्रपती निवडणूक : एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने जगदीप धनकड यांची निवड का केली?
राष्ट्रपती निवडणुकीपाठोपाठ पुढच्या महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने एनडीएचे (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) उमेदवार म्हणून बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली आहे. इतर अनेक नावांची चर्चा सुरू होत असताना जगदीप धनकड यांच्या नावाची निवड करण्यात आल्यानं, त्यांच्या निवडीची कारण काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार म्हणून भाजपने अचानक […]
ADVERTISEMENT

राष्ट्रपती निवडणुकीपाठोपाठ पुढच्या महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने एनडीएचे (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) उमेदवार म्हणून बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली आहे. इतर अनेक नावांची चर्चा सुरू होत असताना जगदीप धनकड यांच्या नावाची निवड करण्यात आल्यानं, त्यांच्या निवडीची कारण काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार म्हणून भाजपने अचानक पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची घोषणा केली. जगदीप धनकड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल असले, तरी ते मूळचे आहेत राजस्थानचे आणि त्यामुळेच त्यांच्या या निवडीला किनार आहे ती राजस्थान विधानसभा निवडणुकीची. त्यामुळेच काही प्रमुख कारणांचा उहापोह केला जात आहे.
शेतकऱ्याचा मुलगा
भाजपच्या संसदीय समितीची बैठक झाल्यानंतर जेपी नड्डा पत्रकार परिषदेत आले. त्यांनी जगदीप धनकड यांचं नाव घेण्याआधी एक शब्द वापरला, तो होता किसान पुत्र म्हणजेच शेतकऱ्याचा मुलगा. शेतकरी पुत्र असलेल्या धनकड यांनी जनतेचा राज्यपाल म्हणून स्वतःची ओळख बनवली आहे, असं नड्डा म्हणाले. म्हणजेच जगदीप धनकड हे एका सर्वसामान्य कुटुंबातून येतात आणि लोकांशी त्यांची नाळ घट्ट आहे, असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न नड्डांनी केला.










