‘या’ देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला का आहेत लठ्ठ, का घडतंय असं?
अरबी देशांमध्ये फार कमी महिला काम करतात. इराकमध्ये दहापैकी फक्त एक महिला कामावर आहे. याचा अर्थ बहुतेक अरब स्त्रिया घरातच राहतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली अधिकतर होत नाहीत.
ADVERTISEMENT
ईराणमधील बगदाद येथे राहणारी झैनब नावाची महिला एका रेस्टॉरंटमध्ये भाजीपाला धुण्याचे काम करते आणि दिवसाला 20,000 दिनार कमवते. पण या पैशातून ती तिच्या कुटुंबासाठी खाण्याची व्यवस्था करू शकत नाही. (Why do Gulf countries have the highest rate of obesity among women than men)
ADVERTISEMENT
ती म्हणते की, शाळेच्या फीसमुळे तिच्या मुलींना त्यांचे शिक्षण सोडावे लागले. झैनबचा बॉस तिला त्याचे उरलेले जेवण किंवा इतर खाद्य पदार्थ देतो. ज्यात मुख्यतः तेल आणि मसाले असतात. आठवड्यातील गुरुवार हा एकमेव दिवस आहे जेव्हा तिला आणि तिच्या मुलींना फळं खायला मिळतात कारण त्या दिवशी त्यांच्या आजूबाजूचे लोक अन्नदान करतात.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या महत्त्वाच्या पदावरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’!
झैनबचे वजन 120 किलो आहे. तिच्या चार मुलींपैकी एकही मुलगी काम करत नाही. ज्यामुळे त्यांचे वजनही वाढण्याची शक्यता असते. जैनबला भीती वाटते की मुलींना बाहेर कामावर पाठवल्यास त्यांना पुरुषांच्या वाईट नजरा किंवा छळाचा सामोरा करावा लागेल म्हणूनच ती त्यांना बाहेर पाठवण्याऐवजी कितीही आर्थिक मंदी असली तरी घरात ठेवण्याला प्राधान्य देते. झैनबच्या मुली घरी राहून घरगुती काम करतात. झैनब कधी कधी त्यांना आईस्क्रीम खायला किंवा धार्मिक स्थळी घेऊन जाते.
हे वाचलं का?
जगभरात महिलांचे वजन पुरुषांपेक्षा जास्त आहे. 15 टक्के महिला आणि 11 टक्के पुरुषांना लठ्ठपणाची समस्या आहेपरंतु लठ्ठपणातील हा फरक जगभरात वेगवेगळा आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील लठ्ठपणामध्ये सर्वात मोठा फरक आहे. तर, दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये हा फरक वेगळा आहे. मध्य पूर्वमधील 26 टक्के महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक लठ्ठपणा आहे.
शिंदे-फडणवीसांनी मुंबईतच घेरलं, पण उद्धव ठाकरेंनी टाकला भलताच डाव!
लठ्ठपणा हा धोकादायक आहे. 2019 मध्ये 11 देशांमध्ये या समस्येने अनेकांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 अरबी देश होते. हे मृत्यू बहुतेक हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे झाले.तर अरबी देशांमध्ये फार कमी महिला काम करतात. इराकमध्ये दहापैकी फक्त एक महिला कामावर आहे. याचा अर्थ बहुतेक अरब स्त्रिया घरातच राहतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली अधिकतर होत नाहीत.
ADVERTISEMENT
त्याच वेळी, इतर क्षेत्रातील नोकरदार महिला रुग्णालये, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी काम करतात. पण अरब देशांमध्ये अशा नोकर्या बहुतांशी पुरुषच करतात. अरब देशांतील महिलांना खेळाचा आनंद घेण्याची संधी फार कमी आहे. मुले आणि मुली रस्त्यावर एकत्र फुटबॉल खेळतात. पण एकदा मुलगी वयात आली की तिचे रस्त्यावर खेळणे बंद होते. त्यांचं फिरणं, प्रवास करणं बंद होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT