विदेशात जाणारे भारतीय Covishield Vaccine घेण्यासाठीच का आग्रही आहेत?

मुंबई तक

Corona व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र कुठलं असेल तर ते म्हणजे लस. लसीकरणावर भारतासह अनेक देशांनी भर दिला आहे. मात्र भारतात सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लसींची उपलब्धता तेवढ्या प्रमाणात नाही. भारतात सध्या दोन लसी दिल्या जात आहेत एक आहे सिरमची कोव्हिशिल्ड आणि दुसरी आहे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Corona व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र कुठलं असेल तर ते म्हणजे लस. लसीकरणावर भारतासह अनेक देशांनी भर दिला आहे. मात्र भारतात सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लसींची उपलब्धता तेवढ्या प्रमाणात नाही. भारतात सध्या दोन लसी दिल्या जात आहेत एक आहे सिरमची कोव्हिशिल्ड आणि दुसरी आहे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. विदेशात जाणाऱ्यांनी मात्र कोव्हिशिल्ड लसीलाच प्राधान्य दिलं आहे. याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊ…

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस आहे. मात्र ही लस घेऊन भारताबाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. त्याऐवजी कोव्हिशिल्ड ही लस आम्हाला द्या अशी मागणी विदेशात जाणारे भारतीय करत आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे WHO ने अद्याप कोव्हॅक्सिन या लसीला मान्यता दिलेली नाही. जगातल्या अवघ्या आठ देशांनी ही लस वापरण्याची संमती दिली आहे. या आठ देशांमध्ये संयुक्त राष्ट्र, युएई, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड किंवा युरोप यामधला एकही देश नाही. या देशांमध्ये भारतातले विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यासाठी जात असतात.

Covaxin की Covishield; कोणती Vaccine जास्त प्रभावी ?

खरंतर आत्तापर्यंत एकाही देशाने असा काहीही दावा केलेला नाही की कोव्हॅक्सिन घेतली असेल तर आमच्या देशात प्रवेश मिळणार नाही. मात्र अशात कोव्हिशिल्ड म्हणजेच जी लस सिरम इन्स्टिट्युट, ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राझेन्का यांनी मिळून तयार केली आहे त्या लसीला 39 देशांनी मंजुरी दिली आहे. तर ऑक्स्फोर्ड आणि एस्ट्राझेन्का यांच्या लसीला ब्रिटन वगळता 100 पेक्षा जास्त देशांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जे भारतीय शिकण्याच्या उद्देशाने भारताबाहेर जात आहेत ते कोव्हिशिल्ड लस मिळावी यासाठी आग्रही आहेत. कोव्हिशिल्ड आणि ऑक्सफोर्ड एस्ट्राझेन्का या दोन्ही लसींना WHO ने मान्यता दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp