देशमुख-मलिकांवर कारवाई झाली पवार दिल्लीत गेले नाहीत,राऊतांवर एवढं प्रेम का?- चंद्रकांत पाटील
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरुद्ध होत असलेल्या ईडी कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची संपत्ती सील केली आहे. ज्यानंतर नवी दिल्लीत शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली, ज्यात पवारांनी मोदींकडे केंद्रीय यंत्रणांचा तपास आणि संजय राऊतांवर झालेली कारवाई या विषयावर […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरुद्ध होत असलेल्या ईडी कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची संपत्ती सील केली आहे. ज्यानंतर नवी दिल्लीत शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली, ज्यात पवारांनी मोदींकडे केंद्रीय यंत्रणांचा तपास आणि संजय राऊतांवर झालेली कारवाई या विषयावर चर्चा केली. नवी दिल्लीचा दौरा आटोपून संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले त्यावेळी शिवसैनिकांनीही त्यांचं जोरदार स्वागत केलं.
परंतू भाजपने शरद पवार यांच्या मोदी भेटीवर निशाणा साधत, शरद पवारांचं संजय राऊतांवर एवढं प्रेम का आहे असा प्रश्न विचारला आहे.
‘पुढची 25 वर्ष भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही’, राऊतांचं मुंबईत परताच जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार-मोदी भेटीवर भाष्य केलं. “महाविकास आघाडी सरकारमधील संजय राठोड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासह अन्य नेत्यांवरही कारवाई झाली. त्यावेळी खासदार शरद पवार दिल्लीला गेले नाहीत, पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर खासदार पवार यांनी तातडीनं दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. खासदार राऊत यांच्यावर शरद पवारांचं एवढं प्रेम का? यावरुन संजय राऊत हे शिवसेनेचे नसून ते खासदार पवार यांचे आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालंय”, असा दावाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय.