Shivsena Vs Narayan Rane: राणेंना शिवसैनिक ‘कोंबडी चोर’ का म्हणतात?; कुणी केलेली सुरुवात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण या अटकेच्या आधी शिवसैनिकांनी राणेंवर तुफान टीका केली आहे. एवढंच नवे तर थेट राणेंच्या फोटोसह ‘कोंबडी चोर’ असे भले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

दरम्यान, जेव्हा-जेव्हा नारायण राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण होतो तेव्हा-तेव्हा नारायण राणे यांना कोंबडी चोर असं म्हणत शिवसैनिक राणेंवर बोचरी टीका करतात. पण राणेंना नेमकं असं का म्हटलं जातं आणि त्याची सुरुवात कोणी केली हे आता आपण जाणून घेणार आहोत.

नारायण राणे यांना शिवसैनिक कोंबडीचोर का म्हणतात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नारायण राणे हे कधी काळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. तसेच ते बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) अत्यंत विश्वासू म्हणून देखील समजले जायचे. पण याच नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर स्वत: बाळासाहेब हे त्यांच्यावर प्रचंड टीका करत असे. दरम्यान, शिवसेना सोडल्यापासून शिवसैनिक हे वारंवार राणेंचा कोंबडीचोर असा उल्लेख करतात. त्याचविषयी जाणून सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

सुरुवातीला म्हणजे जेव्हा शिवसेनेची स्थापना करण्यात आली तेव्हाच नारायण राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं वलय आणि शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष यामुळे अगदी लहान वयातच नारायण राणे हे शिवसेनेकडे ओढले गेले होते.

ADVERTISEMENT

सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील चेंबूरमध्ये राहत होते. इथे बाळासाहेबांची होणाऱ्या भाषणाला ते आवर्जून हजर राहायचे. यावेळी वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचं सदस्यत्व मिळविण्यासाठी तेव्हा 18 वर्षांची अट असायची मात्र, राणेंनी आपलं वय अधिकचं असून शिवसेनेते प्रवेश मिळवला होता.

या सगळ्या दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती ही हालाखीची होती. त्यामुळे नारायण राणेंना अनेक कामं करायला लागायची. अशावेळी नारायण राणे यांचा एक मित्र होता हनुमंत परब नावाचा. चेंबूरच्या सुभाषनगर भागात ही जोडी खूपच फेमस होती.

नकळत्या वयात हे दोघेही जण चेंबूरमध्ये काहीसे हुल्लडबाजी करायचे. त्यावेळी या दोन्ही मित्रांनी काही कोंबड्या देखील चोरल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. असं म्हटलं जातं की, त्यांची ही चोरी एकदा पकडली गेली होती. तेव्हा शिवसेनेच्या एक तालेवार नेत्याने या दोघांना सोडवलं होतं.

Narayan Rane: ‘मी काय नॉर्मल माणूस आहे का?, वर आमचं पण सरकार आहे’, राणेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, शिवसेनेत गेल्यानंतर राणे यांना सत्तेची अनेक पदं मिळत गेली. एवढंच नव्हे तर राज्याचं सर्वोच्च असं मुख्यमंत्रीपद देखील त्यांना मिळालं. पण शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इथूनच नारायण राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण झाला.

जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा सेनेला त्याचा बराच फटका बसला होता. कारण त्यांचे अनेक आमदार हे राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते. अशावेळी सुरुवातीच्याच काळात बाळासाहेबांनी ज्या सभा घेतल्या त्यात नारायण राणे यांना कोंबडीचोर असं संबोधण्यास सुरुवात केली. अगदी शेवटपर्यंत बाळासाहेब हे आपल्या जाहीर सभांमधून राणेंना अशाच प्रकारे बोलायचे.

तेव्हापासूनच अनेकदा नारायण राणे यांना शिवसैनिक देखील कोंबडीचोर म्हणून त्यांच्यावर टीका करतात. 2017 साली वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर देखील शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर कोंबड्या आणून जल्लोष साजरा केला होता.

दुसरीकडे आता मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर थेट कोंबडीचोर असे बॅनर लावून शिवसैनिकांनी राणेंवर टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT