Maharashtra Weather: रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यात पावसाचा वेग अचानकपण मंदावला, पाहा नेमकं कसं असेल वातावरण
Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण सध्या पावसाचा वेग हा अचानकपणे मंदावला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभाग

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

खालीलप्रमाणे मुख्य भागांसाठी अंदाज जारी
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण सध्या पावसाचा वेग हा अचानकपणे मंदावला आहे. आज (12 सप्टेंबर) राज्यातील बहुतेक भागांत ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता 13 सप्टेंबरपासून वाढण्याची शक्यता असून, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे. खालीलप्रमाणे मुख्य भागांसाठी अंदाज जारी केला आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! चिमुरडीचा गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला, त्याच ठिकाणी वडिलांचाही मृतदेह... हादरून टाकणारं प्रकरण
कोकण विभाग आणि पुणे :
कोकणासह मुंबईत दिवसभर ढगाळ आणि पावसाळी वातावरण. कमाल तापमान 29°से असून, किमान 25°से राहील. पावसाची शक्यता 60% असून, 12 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. पश्चिमेकडून 10 ते 15 किमी/तास वेगाची वारे वाहतील. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने, वाहतूकदार सावध राहावेत, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यम पाऊस आणि ढगाळ आकाश. कमाल तापमान 28°से, किमान 24°से. पावसाची शक्यता 50% ते 70% असून, एकूण पावसाची मात्रा 8-10 मिमी इतकी असू शकते. आर्द्रता 80% पेक्षा जास्त राहील.
विदर्भ :
विदर्भातील नागपूरात जोरदार पावसाचा इशारा. कमाल तापमान 30°से, किमान 25°से. पावसाची शक्यता 70% असून, 15 मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला जाईल असा हवामान विभागाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची हवामान विभागाची शक्यता आहे.
हे ही वाचा : बीडमध्ये सात महिन्याच्या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकलं, लहान बाळाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान 29°से ते किमान तापमान हे 23°से. असेल. तसेच 40 ते 60 % पावसाची शक्यता आहे.