Nano Banana Trend: Google Gemini 3D फोटो नेमका कसा तयार करायचा? 'या' Tips लक्षात ठेवा अन् 1 मिनिटात...

मुंबई तक

गूगलने नुकतेच लाँच केलेले Gemini 2.5 Flash Image जे म्हणून Nano Bananaओळखले जाते. पाहा यामध्ये नेमके फोटो कसे तयार करायचे.

ADVERTISEMENT

nano banana trend what is the viral 3D figurine craze and how to create one for free
फोटो सौजन्य: अभिनेत्री सोनाली पाटील/Instagram
Google CTA

मुंबई: सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड व्हायरल होत आहे, जिथे लोक स्वतःचे किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचे 3D मॉडेल्स शेअर करत आहेत. यामागचे रहस्य आहे गुगलचे नवीन AI टूल, ज्याला 'Nano Banana' असे म्हटलं जात आहे. याचे अधिकृत नाव आहे Gemini 2.5 Flash Image. हे विनामूल्य टूल कोणत्याही फोटोला काही सेकंदातच आकर्षक आणि वास्तववादी 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला डिझायनर असण्याची किंवा महागड्या सॉफ्टवेअरची गरज नाही. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्वतःचे 3D मॉडेल तयार करू शकता. चला असे फोटो नेमके कसे तयार करायचे हे आपण स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊया.

Nano Banana म्हणजे नेमके काय?

Nano Banana हे गूगलच्या Gemini 2.5 Flash Image या प्रगत AI टूलचे नाव आहे, जे LMArena वरच्या युजर्सनी दिले आहे. हे टूल तुम्ही अपलोड केलेल्या कोणत्याही फोटोला अचूक आणि वास्तववादी 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करते. यामुळे व्यक्ती, कपडे आणि पार्श्वभूमी यांचे तपशील अगदी अचूकपणे जपले जातात, ज्यामुळे तुमचे फोटो कलेक्टेबल स्टाइलच्या 3D मॉडेल्समध्ये बदलतात.

स्वतःचे 3D मॉडेल म्हणजेच Nano Banana फोटो असे तयार करा

स्टेप 1: Nano Banana सुरू करा

- तुमच्या Google Chrome, Safari किंवा इतर कोणत्याही ब्राउझरवर Google AI Studio सर्च करा.