कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू, बातमी समजताच पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी घटना
नांदेड: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाने हाहाकार उडाला आहे. हे संकट दिवसेंदिवस अधिकच जीवघेणं ठरत आहे. कारण राज्यात कोरोनामुळे (Corona) दररोज शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण आता एक अशी घटना समोर आली आहे ज्याने आपलं देखील हृदय पिळवटून जाईल. नांदेडमधील (Nanded) लोहा शहरातील बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबाला कोरोनाच्या आघाताने आपल्या जीवाला मुकावं लागलं […]
ADVERTISEMENT
नांदेड: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाने हाहाकार उडाला आहे. हे संकट दिवसेंदिवस अधिकच जीवघेणं ठरत आहे. कारण राज्यात कोरोनामुळे (Corona) दररोज शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण आता एक अशी घटना समोर आली आहे ज्याने आपलं देखील हृदय पिळवटून जाईल.
ADVERTISEMENT
नांदेडमधील (Nanded) लोहा शहरातील बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबाला कोरोनाच्या आघाताने आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे. आंध्रप्रदेशातून आलेल एक कुटुंब रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. पण कोरोना व्हायरसने या कुटुंबात शिरकाव केला आणि होत्याचं नव्हतं झालं.
आंध्रप्रदेशातून आलेलं हे कुटुंब नांदेडमध्ये रोजी-रोटीसाठी पडेल ते काम करायचं याचवेळी या कुटुंबातील हनुमंत शंकर गदम याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्याने त्याला लोहा येथील कोव्हिड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Corona Death) झाला.
हे वाचलं का?
स्मशानभूमीही गहिवरली: Corona मृत्यू झालेल्या 19 मृतदेहांवर उस्मानाबादमध्ये एकाचवेळी अंत्यसंस्कार
पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही बातमी जेव्हा हनुमंत याच्या पत्नीला कळाली तेव्हा तिला हा धक्का सहन झाला नाही आणि तिने आपल्या तीन वर्षाच्या मुलासह सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. या घटनेनं संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ही घटना बुधवारी पहाटे घडली असावी, असा अंदाज नांदेड पोलिसांनी व्यक्त केला आहे. पद्मा हनुमंत गदम (वय 35 वर्ष) लल्ली (वय 3 वर्ष) अशी मृत माय-लेकरांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माने नवऱ्याच्या निधनानंतर तीन वर्षाच्या मुलाला घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा या चिंतेने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
धक्कादायक! नागपूरच्या Covid Care सेंटरमधे ऑक्सिजन संपल्याने चार रूग्णांचा मृत्यू
फिर्यादी चिन्नना दुर्गना गदम (वय 39 वर्ष) रा. संतोष नगर निजामबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला काय-काय पाहावं लागणार आहे अशीच भावना आता सगळीकडे व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावं लागत आहे. मात्र, तरीही अनेक जण आजही कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे सरकारवर देखील पुन्हा लॉकडाऊनची वेळ ओढावली आहे. पण नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घेतली नाही तर राज्यातील परिस्थिती ही अत्यंत बिकट होऊ शकते. (wife committed suicide along with her three year old son when she heard the news of her husbands death due to corona)
बीड : कोविड रुग्णांचा मृत्यू, आठ जणांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 58 हजार 952 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात काल दिवसभरात 278 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.64 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 39 हजार 624 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 29 लाख 5 हजार 721 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81.21 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 28 लाख 2 हजार 200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35 लाख 78 हजार 160 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 55 हजार 206 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 12 हजार 70 रूग्ण सक्रिय आहेत.
प्रमुख जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपुरात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. नागपुरात 65 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यात 1 लाख 12 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. ठाण्यात 84 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT