Sumitra Mahajan: कोश्यारी जाणार, मराठी माणूस राज्यपाल होणार?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Will Sumitra Mahajan come to Maharashtra as Governor: डोंबिवली: लोकसभेच्या माजी अध्यक्षा (Former Speaker of Lok Sabha) सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या नावाची महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) म्हणून वारंवार चर्चा सुरु असते. अशातच डोंबिवलीतील (Dombivli) एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एक विधानामुळे पुन्हा त्याच चर्चेला जोर आला आहे. नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( यांनी आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करावं अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्यामुळेच आता कोश्यारी जाऊन महाजन येणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. (will sumitra mahajan come to maharashtra as governor instead of koshyari see what mahajan said about post of governor)

ADVERTISEMENT

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘आता हा विषय कोणी कुठून आणला हे माहिती नाही. मी एकदा गमंत केली होती. तिसऱ्या क्रमांकाचं पद भूषवलं. आता काही इच्छा नाही आणि आता ताकद पण नाही.’

‘पण कोणीतरी एकदा म्हणाला म्हटवलं की, असं कसं चालेल म्हणून.. मग मी देखील म्हटलं ठीक आहे. पार्टीला सांगा त्यांनी मला महाराष्ट्राचं पालक करावं. मी जाईन. पालक केलं तर मी जाईन काही महाराष्ट्राचा लोकांसाठी. पण पालक म्हणून…’

हे वाचलं का?

‘पण खरं सांगू का.. पुष्कळ पदे झाली.. त्यामुळे इथे उगाच कशाला ढवळाढवश करू. माझा मध्यप्रदेश मला भरपूर मान देतो. माझा इंदौर अजूनही माझ्याकडे विचारायला येतो. महाराष्ट्र सुद्धा माझा आहे. माझं माहेर आहे.. म्हणून कधी कधी वाईट वाटतं. पण आता मला यावे लागेल तर पालक म्हणून येईन.’ असं सुमित्रा महाजन यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आता कोश्यारी यांच्यानंतर सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा 2024 : रणनीती ठरली, सेनापती निवडले! भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नेत्यांवर मोठी जबाबदारी

ADVERTISEMENT

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीची महाजनांनी सांगितली आठवण…

दरम्यान, डोंबिवलीच्या याच कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांनी लोकसभेतील राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीचीही आठवण सांगितली.

ADVERTISEMENT

‘काही वेळा काही गोष्टी अचानक घडतात.. तुम्हालाही याचे अनुभव आहे असतील. तेव्हा आपण म्हणतो की, आपण अवाक् झालो. अवाक् होणं आणि परत नॉर्मलसीमध्ये येणं यामध्ये थोडा वेळ लागतो. तसं माझंही झालां. जेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लोकसभेत मिठी मारली होती तेव्हा.’

‘जेव्हा राहुल गांधी हे त्यांच्या जागेवरुन पंतप्रधानांच्या दिशेने जायला लागेल तेव्हा म्हटलं.. हा इकडे का जातोय. मला तर कळलंच नाही. तो तिथे गेल्यावर मी मनातल्या मनात म्हटलं.. देवा आता मोदीजी उठू नका.. कारण ते त्या ज्या जागेवर बसले होते तोवर पंतप्रधान होते. जर ते उभे राहिले असते आणि बाहेर आले तर ते मोदीजी होते.. हे सगळं माझ्या डोक्यात त्यावेळी सुरू होतं. म्हणून मी प्रार्थना केली.. पण मोदीजींनीही हे भान सांभाळलं. ते उठले नाहीच.. तुम्ही पाहिलं असणार. म्हणून राहुल गांधींनी केलेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरल्या.’ असं सुमित्रा महाजन यावेळी म्हणाल्या.

आज लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातलं चित्र कुणासाठी कसं? सी व्होटर्सच्या यशवंत देशमुखांनी दिलं उत्तर

सुमित्रा महाजनांनी केलं राहुल गांधींचं कौतुक!

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं देखील सुमित्रा महाजन यांनी बरंच कौतुक केलं आहे.

‘राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेनिमित्त संपूर्ण देशात पायी फिरत आहे. ही माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना भारत किती कळला हे लवकरच समजेल. पण मला त्यांची ही गोष्ट खरंच आवडली.. ही चांगली गोष्ट आहे, त्याला बाकीच्यांनी साथ द्यावी. त्याच्यात चांगले बदल व्हावे अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते. कारण विरोधी नेता देखील सक्षम असावा लागतो लोकशाहीमध्ये. तसेच समजदार असावा लागतो.’ असंही सुमित्रा महाजन यांनी यावेळी म्हटलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT