बाई, बुब्स आणि ब्रा! अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टचं Social Media वर भरभरून स्वागत
अभिनेत्री हेमांगी कवीने आत्तापर्यंत विविध सीरियल्स, सिनेमांमधून काम केलं आहे. ती फुलराणी या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे तिच्या एका पोस्टची. बाई, ब्रा आणि बुब्स असं टायटल देऊन हेमांगीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवर, अंतर्वस्त्रांवरून ती वापरायची की नाही […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री हेमांगी कवीने आत्तापर्यंत विविध सीरियल्स, सिनेमांमधून काम केलं आहे. ती फुलराणी या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे तिच्या एका पोस्टची. बाई, ब्रा आणि बुब्स असं टायटल देऊन हेमांगीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवर, अंतर्वस्त्रांवरून ती वापरायची की नाही यावरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने खणखणीत उत्तर दिलं आहे.
बाई, ब्रा आणि बुब्स नावाच्या पोस्टमध्ये हेमांगी काय म्हणते?
बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो! मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हा त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!
पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…