फ्लोअर मिलच्या पट्ट्यात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, साफसफाई करणं बेतलं जिवावर
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील MIDC भागात प्लोअर मिलच्या पट्ट्यात साडी अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मातृकृपा फ्लोअर मिल इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी फ्लोअर मिल कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद नगर एमआयडीसी परिसरात मातृकृपा दाल अँड फ्लोअर मिल या कंपनीत डाळ दळून […]
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील MIDC भागात प्लोअर मिलच्या पट्ट्यात साडी अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मातृकृपा फ्लोअर मिल इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी फ्लोअर मिल कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद नगर एमआयडीसी परिसरात मातृकृपा दाल अँड फ्लोअर मिल या कंपनीत डाळ दळून बेसन तयार केलं जातं. या कंपनीत कमल तेलंगे ही महिला साफसफाईचं काम करत होती. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर कमल या चक्की सुरू असताना चक्कीच्या बाजूला साफसफाई करत होत्या. याचवेळी त्यांची साडी चक्कीच्या पट्ट्यात अडकून त्यांचा अपघात झाला.
स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू
हे वाचलं का?
कमल या चक्कीच्या पट्ट्यात अडकल्याचे पाहताच काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ मशीन बंद करून कमल यांना त्यातून बाहेर काढलं. या अपघातात कमल यांना गंभीर दुखापत झाली होती. कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं परंतू उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड
ADVERTISEMENT
या घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी दोन महिने चौकशी करून अखेर कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कमल तेलंगे यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश उर्फ राजू वालेकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक उपयोजना नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक झालेली नाहीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT