आशिष शेलार-भास्कर जाधवांमध्ये शाब्दिक चकमक, नार्वेकर म्हणाले…
Ashish Shelar vs Bhaskar Jadhav : विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवदेनाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर नियमांचा हवाला देत भाष्य केलं. विधान परिषदेतील चर्चेवरून विधानसभेत […]
ADVERTISEMENT

Ashish Shelar vs Bhaskar Jadhav : विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवदेनाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर नियमांचा हवाला देत भाष्य केलं.
विधान परिषदेतील चर्चेवरून विधानसभेत काय घडलं?
आशिष शेलार म्हणाले, “या सदनानाच अवमान होण्याची स्थिती किंवा अवमान होईल, असं कुणाच्या मनात नसतं. तसं कुणी करेल असं नाही, पण तरीही… दोन सभागृह आहेत आणि वरच्या सभागृहाचं कामकाज वेगळं चालतं. शक्यतो आपण दोन्ही सभागृहाबद्दल चर्चा एकमेकांच्या सभागृहात करत नाही. काल विधान परिषदेत चर्चा झाली. त्यातून वर्तमान पत्रात बातम्या आल्या. त्यातून वरिष्ठ सभागृह कुठलं? अधिकार कुणाचे? विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चा व्हावी इथपर्यंत चर्चा विधान परिषदेत झाली. दोन्ही सभागृहांनी एकमेकांना मानसन्मान देऊन समजूतीने चाललं पाहिजे. त्यातही काही गोष्टी असतील, तर दालनामध्ये या विषयी चर्चा करणं अपेक्षित आहे.”
“अध्यक्षांनी एक निर्णय घेतला आणि त्यावर कार्यवाही सुरू झाली. त्यावरून वरच्या सभागृहात सदस्य पॉाईंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलले आणि त्यावर सभागृहाच्या उपसभापतींनी त्यावर भाष्य केलं. काही निर्देश दिले. निर्णय दिले. त्याचा पूर्ण सन्मान राखून, मी बोलत आहे. भारतीय संविधानात याची संपूर्ण स्पष्टता आहे.”
“178 खाली विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे अधिकार, 179 विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त असेल, त्याबद्दल स्पष्टता आहे. 180 मध्ये अध्यक्षांच्या कर्तव्यांबद्दलची स्पष्टता आहे. 182 मध्ये सभापती, उपसभापती, 183 मध्ये सभापती, उपसभापतींचं पद रिक्त असेल, तर…, या सगळ्या परिस्थिती सभापती नसतात त्याबद्दलच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केलेला आहे. अशा स्थितीत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णयावर भाष्य होऊन वरिष्ठ सभागृह कुठलं अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं जातं. याबद्दलची स्पष्टता येणं आवश्यक आहे. ही चर्चा वरिष्ठ सभागृहात झाली असून, वर्तमानपत्रामध्ये छापूनही आलं आहे.”
Ramesh Patil: “आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर”, भाजप आमदारांचं विधान









