Bacchu kadu : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; वृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना झापलं
80 year old farmer on Bacchu kadu : धाराशिव : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’, असं थेट धाराशिव (Dharashiv) येथे एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने प्रहारचे (Prahar Party) आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांना सुनावलं. ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय, ते आपण करत नाही. तुम्ही महाडाकूंसोबत गेलात, असं म्हणत या शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांची गाडी […]
ADVERTISEMENT
80 year old farmer on Bacchu kadu : धाराशिव : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’, असं थेट धाराशिव (Dharashiv) येथे एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने प्रहारचे (Prahar Party) आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांना सुनावलं. ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय, ते आपण करत नाही. तुम्ही महाडाकूंसोबत गेलात, असं म्हणत या शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांची गाडी अडवली. यादरम्यान बच्चू कडू यांच्या समर्थकांनी या शेतकऱ्याशी अरेरावी करत बाजूला केलं. शेवटी बच्चू कडूंनी तिथून पळ काढला. Farmer angry on mla Bacchu kadu
ADVERTISEMENT
राज्यमंत्री बच्च कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, २५ हजारांचा दंड
बच्चू कडूंना 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याने सुनावलं
बच्चू कडू हे धाराशिव येथे कोर्टाच्या तारखेसाठी आले होते. यादरम्यान कोर्टातील काम संपवून ते निघत असताना. काही शेतकऱ्यांनी त्यांना घेरलं. यापैकी 80 वर्षीय शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडू यांना आपण गद्दारी का केली, असा जाब विचारला. यादरम्यान बच्चू कडू यांनी काही न बोलता गाडीत बसून निघत असताना त्या आजोबांनी गाडीच्या समोर जात गाडी अडवून धरली.
हे वाचलं का?
जनतेला का त्रास देत आहात?, शेतकऱ्याचा सवाल
गाडी समोर उभं राहून आपण डाकूंसोबत गेलात असं ते म्हणू लागले. काय वागत आहात तुम्ही. लोकशाही टिकवा. घटना टिकवून त्याप्रमाणे वागा. का जनतेला त्रास देत आहात, असा थेट सवालच त्या शेतकरी आजोबांनी बच्चू कडूंना केला. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने ओढत त्यांना बाजूला केलं. यादरम्यान बच्चू कडूंनी काही न बोलता मौन साधला.
‘सरकार पडलं तरी बेहत्तर पण…’ : बच्चू कडू गुवाहटीत कामाख्या देवीला मागणार आशीर्वाद
ADVERTISEMENT
बच्चू कडू महाडाकुंसोबत गेले : शेतकरी
माध्यम प्रतिनिधीनींनी त्यांना आक्रमक होण्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले बच्चू कडूंना ज्या धोरणानं, ज्या आशेनं निवडून दिलं तसं ते वागत नाहीत. बच्चू कडू महाडाकु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबत गेले. लोकशाहीची थट्टा सुरु केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या वृद्ध शेतकऱ्याने दिली.
ADVERTISEMENT
बच्चू कडू यांना सोमवारी धाराशिव सत्र न्यायालयाने 2015 सालच्या प्रकरणात एक दिवस कोर्टात बसून राहण्याची आणि दंड भरण्याची शिक्षा सुनावली होती. त्यांनी धाराशिव येथील जिल्हा परिषद कार्यालयात गोंधळ घालत पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली होती. त्याचप्रकरणी त्यांना न्यायाधिश राजेश गुप्ता यांनी शिक्षा सुनावली होती. सगळं संपवून बच्चू कडू बाहेर पडत असताना हा प्रकार घडला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT