Palghar : PUBG खेळत असताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला
एका १६ वर्षाच्या मुलाला पबजी (PUBG) हा गेम खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. पबजी (PUBG) खेळत असताना हा मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आहे. सेल्फी घेताना डोंगरकड्यावरून पडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र आता पबजी (PUBG) हा खेळ खेळताना एक मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आहे. शादान शेख असं या मुलाचं नाव आहे. पबजी […]
ADVERTISEMENT
एका १६ वर्षाच्या मुलाला पबजी (PUBG) हा गेम खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. पबजी (PUBG) खेळत असताना हा मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आहे. सेल्फी घेताना डोंगरकड्यावरून पडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र आता पबजी (PUBG) हा खेळ खेळताना एक मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आहे. शादान शेख असं या मुलाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
पबजी (PUBG) खेळताना खाली पडल्याने हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पालघरच्या रिलिफ रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पालघरमधल्या शिरगावमध्ये रविवारी (१५ मे) ही घटना घडली आहे. १६ वर्षांच्या या तरूणाला पबजी खेळणं चांगलंच महागात पडलं आहे.
हे वाचलं का?
नेमकं काय घडलं?
शादान हा १६ वर्षांचा मुलगा शिरगाव या ठिकाणी असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी (PUBG) हा खेळ खेळत होता. तो या खेळात इतका गुंतला की त्याला आपण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आणि दुसऱ्या मजल्यावर आहोत याचाही विसर पडला. खेळता खेळता तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT
PUBG गेमच्या नादात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या?, राहत्या घरात घेतला गळफास
ADVERTISEMENT
पबजीची भुरळ तरूणांना कशी पडली आहे याचं हे नवं उदाहरण आहे. याआधी अनेक अशा बातम्या समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पबजी खेळता खेळता एक १२ वर्षांचा मुलगा नांदेडहून थेट नाशिकला पोहचला होता त्याचीही बातमी झाली होती. हा मुलगा गेम खेळता खेळता रेल्वेत बसला. स्पर्धा वाढत गेली आणि आपण कुठून कुठे चाललो आहोत याचंही भान त्याला राहिलं नाही. हा मुलगा घरी आला नाही त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. घरातले रेल्वे पोलिसांपर्यंत पोहचले. व्हॉट्स अॅपवर मुलाचा फोटो पोलिसांना दिला. त्यावेळी संध्याकाळी तपोवन एक्स्प्रेसने हा मुलगा नांदेडहून नाशिकला आल्याचं समोर आलं.
मुंबईत PUBG खेळण्यासाठी 16 वर्षांच्या मुलाने आईच्या बँक खात्यातून खर्च केले 10 लाख
पबजी खेळामुळे अशा घटना वारंवार घडल्या आहेत. पालक आपल्या हातातलं काम पूर्ण व्हावं या उद्देशाने किंवा इतर कोणत्याही उद्देशाने मुलांच्या हाती मोबाइल देतात. मग मुलं गेम खेळण्यात एवढी दंग होतात की त्यांना कसलंच भान उरत नाही. त्यामुळे गेमिंग करणाऱ्या मुलांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मुंबईतही अशीच एक घटना समोर आली होती ज्यामध्ये या मुलाने आपल्या आई वडिलांच्या बँक अकाऊंटमधले लाखो रूपये खेळावर उडवले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT