सध्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘गदर 2’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.
याठिकाणचा एक व्हिडीओ अभिनेता सनी देओलने शेअर केला आहे.
सनी देओलने शेअर केलेल्या या व्हिडीओ लोकांकडून लाईक केला जात आहे.
या व्हिडीओमध्ये सनी देओल एका शेतकऱ्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे.
एक शेतकरी बैलगाडीतून जात असताना अचानक त्याच्यासमोर सनी देओल उभा राहिला.
बैलगाडीतून काय नेताय, असं सनी देओलने शेतकऱ्याला विचारलं असता शेतकरी म्हणाला,जनावरांसाठी चारा नेतोय.
नंतर सनी देओल शेतकऱ्याशी हात मिळवतो. मात्र, शेतकरी सनी देओलला ओळखूच शकत नाही.
पुढे शेतकरी म्हणाला, तुम्ही सनी देओलसारखेच दिसता. शेतकऱ्याचं ते वाक्य ऐकून सनी हसायला लागतो.
‘हो, तो मीच आहे,’ असं सनीने सांगितलं तेव्हा शेतकरी अवाक् झाला. ‘अरे बापरे’ म्हणत त्यांनी पुन्हा सनीशी हात मिळवला.
‘आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे चित्रपट व व्हिडीओही पाहतो’, असं शेतकरी पुढे म्हणाला.