अंगावर कपडे असताना स्पर्श केला तरीही लैंगिक शोषणच, सुप्रीम कोर्टाने बदलला हायकोर्टाचा निर्णय
त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार किंवा शोषण होऊ शकत नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र हा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने बदलला आहे. त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला तरच लैंगिक अत्याचार म्हणता येईल असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्यावरून चांगलाच वादही निर्माण झाला होता. काय म्हटलं […]
ADVERTISEMENT

त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार किंवा शोषण होऊ शकत नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र हा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने बदलला आहे. त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला तरच लैंगिक अत्याचार म्हणता येईल असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्यावरून चांगलाच वादही निर्माण झाला होता.
काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने?
पॉक्सो कायद्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय आहे. त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नाही, तरीही पॉक्सो कायदा लागू होतो. असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. न्या. यू. यू. ललित, न्या. रविंद्र भट आणि न्या. बेला त्रिवेदी या तीन सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला. लैंगिक हेतूने शरीराच्या गुप्तांगाना स्पर्श केला तरीही पॉक्सो कायद्याचेच प्रकरण मानले जाईल. कपड्यांवरून मुलीला स्पर्श करणे लैंगिक शोषण नाही असे म्हणता येणार नाही. पॉक्सो कायद्यातील कलम सात नुसार स्पर्श आणि शारीरीक संपर्काचा अर्थ त्वचेचा त्वचेशी संपर्क इथपर्यंत ठेवल्याने तो संकुचित मूर्खपणा ठरेल.