आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील सचिन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आमच्या शेतकरी बापासाठी कधी आंदोलन करशील सचिन? असा प्रश्न विचारत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर क्रीडी विश्व, तसंच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून देशांतर्गत विषयात इतर लोकांनी नाक खुपसू नये असं ट्विट केलं आहे. सचिन तेंडुलकरनेही यासंदर्भातलं ट्विट केलं होतं. त्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत त्याला शेतकऱ्यांसाठी कधी ट्विट करशील असा प्रश्न विचारला आहे.

रणजित बागल असे या तरुणाने हे आंदोलन केलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तो प्रवक्ता आहे. सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट कधी करशील असा सवाल त्याने विचारल्याचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय होतं सचिनचं ट्विट?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda, असं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं होतं.

एरवी सचिन तेंडुलकर कोणत्याही मुद्द्यावर व्यक्त होत नाही. मात्र या विषयावर त्याने ट्विट केलं आहे. ज्यानंतर तो ट्रोलही झाला. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिनला प्रश्न विचारत आंदोलन केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT