WTC 2023: टीम इंडियाला लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट कन्फर्म

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Team india in WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाविरूद्धचा चौथा टेस्ट सामना एकिकडे ड्रॉकडे झूकत असताना टीम इंडियासाठी (Team india) मोठी बातमी समोर आली आहे.टीम इंडियाच वर्ल्ड टेस्टच चॅम्पियनशीपमधलं (WTC Final) स्थान पक्क झालं आहे.त्यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान संपूर्ण क्रिकेट वर्तुळाच लक्ष एकिकडे चौथ्या टेस्ट सामन्य़ाच्या निकालाकडे लागले असताना अचानक सामन्या दरम्यानच असं काय झालं की टीम इंडिया WTC च्या फायनलमध्ये पोहोचली आहे? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे.दरम्यान नेमकं अस काय गणित जुळून आलंय, ज्यामुळे टीम इंडियाचं तिकीट कन्फर्म झालंय, हे जाणून घेऊयात. (team india reach world test championship 2023 final india vs Australia oval test details)

सामना ड्रॉ होण्याच्या दिशेने

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावाच 571 धावा केल्या होत्या. विराटच्या (Virat Kohli) 186 धावा, शुबमन गिलच्या 128 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या गाठलीय. या धावसंख्येसह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात या धावांची आघाडी पुर्ण केली असून, सामना ड्रॉच्या दिशेने जाताना दिसत आहे. WTC च्या दृष्टीने टीम इंडियाला या विजयाची खुप आवश्यकता होती. हा सामना जिंकून टीम इंडिया WTCची फायनल गाठणार होती.मात्र आता या विजयाविनाच टीम इंडिया WTC च्या फायनलमध्ये दाखल झाली आहे.

Virat kohli Records: सचिन तेंडुलकरनंतर कोहलीच! वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने सुसाट

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीम इंडियाचं WTC च्या फायनलमध्ये

टीम इंडियाच्या (Team India) WTC च्या फायनलच तिकीट न्युझीलंड विरूद्ध श्रीलंकेमध्ये रंगलेल्या दोन टेस्ट सामन्य़ावरही निर्भर होते. याच सामन्याचा निकाल आता समोर आला आहे आणि टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. श्रीलंकेविरूद्धचा पहिला टेस्ट सामना न्युझीलंडने दोन विकेट राखुन जिंकला आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह टीम इंडिया WTCच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.

Ind Vs Aus: तीन वर्षानंतर अखेर प्रतिक्षा संपली, विराट कोहलीने ठोकलं शतक

ADVERTISEMENT

असा रंगला सामना

क्राइस्टचर्चेमध्ये रंगलेल्या टेस्ट सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात न्युझीलंडने पहिल्या डावात 373 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात श्रीलंकेने 302 धावा केल्या. यामुळे श्रीलंकेने न्युझीलंड 285 धावांचे लक्ष्य दिले. सामन्याच्या शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठणे शक्य नव्हते. मात्र न्युझीलंडच्या खेळाडूंनी शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळत 2 विकेटने सामना जिंकला. या सामन्यात श्रीलंका पराभूत झाल्य़ाने टीम इंडियाच WTCच्या फायनलमधलं स्थान पक्क झाले आहे.

ADVERTISEMENT

PSL: 33 षटकार अन् 500 पेक्षा जास्त धावा, दोन संघानी मिळून बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

7 जूनला रंगणार फायनल सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. हा सामना 7 ते 11 जुन दरम्यान लंडनच्या ओव्हर मैदानावर खेळवला जाणार आहे.या सामन्यासाठी 12 जूनही रिजर्व ठेवली आहे. दरम्यान टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी फायनलमध्ये त्याना न्युझीलंडने हरवले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT