Viral Video : सिंहाच्या पिंजऱ्यात पर्यटकाने हात घातला, वनराजाने घडवली जन्माची अद्दल

जाणून घ्या कोणता आहे हा हा व्हीडिओ आणि का होतो आहे व्हायरल?
the lion ate the finger of the tourists hand viral video
the lion ate the finger of the tourists hand viral video

सिंह हा जंगलचा राजा, तो पिंजऱ्यात असला तरीही त्याचा रूबाब पाहण्यासारखाच असतो. पिंजऱ्यातल्या सिंहाकडे पाहतानाही अनेकांची भीतीने गाळण उडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्या व्हीडिओत एक पर्यटक सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसतो आहे. सिंहच तो.. तो काय गप्प बसणार का? त्याने या पर्यटकाला जन्माची अद्दल घडवली आहे.

काय आहे व्हीडिओ?

हा व्हीडिओ अफ्रिकेतल्या प्राणी संग्रहालयतला आहे. या प्राणी संग्रहालयाला अनेक पर्यटक भेट देत असतात. एक अतिउत्साही पर्यटक सिंहाला पाहून त्याची थट्टा करू लागला. एवढंच नाही तर त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात हातही घातला. आधी त्याने सिंहाला गोंजारलं. त्यावेळी सिंह काही सेकंद शांत उभा राहिला. त्यानंतर या उत्साही पर्यटकाने थेट सिंहाच्या तोंडात हात घातला. झालं सिंह इतका चिडला की त्याने या पर्यटकाची बोटं आपल्या दातांमध्ये घट्ट पकडली. काय झालं आहे आपल्यासोबत या संकटाची कल्पना पर्यटकाला आली म्हणून त्याने हात सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. सिंहाने त्याचा हात सोडला पण या सगळ्या झटापटीत सिंहाने पर्यटकाची बोटं तोडली.

the lion ate the finger of the tourists hand viral video
अकोला : वाघाच्या भीतीने उडाली गावकऱ्यांची झोप, वनविभागाचं पथक सतर्क

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. पर्यटकाला सिंहाशी मस्ती करणं अंगाशी आल्याचं आणि सिंहाने त्याला जन्माची अद्दल घडवल्याचं या व्हीडिओत दिसतं आहे. हा व्हीडिओ @OneciaG या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून तो चांगलाच व्हायरलही झाला आहे.

व्हीडिओत काय दिसतं आहे?

अफ्रिकेतल्या प्राणी संग्रहालयातला हा व्हीडिओ आहे. एक पर्यटक अत्यंत उत्साहाच्या भरात सिंहाच्या पिंजऱ्याजवळ येतो. त्यानंतर तो सिंहाची आयाळ ओढतो, कान ओढतो. सिंह काही सेकंद शांत उभा राहतो. मात्र सिंहाची आयाळ ओढल्यानंतर सिंह त्याला पिंजऱ्यातून पंजा मारण्याचा प्रयत्न करतो. सिंहाने मारलेला पंजा हा पर्यटक चुकवतो आणि आपला हात थेट सिंहाच्या तोंडात घालतो. यानंतर चिडलेला सिंह पर्यटकाची बोटं तोंडात घट्ट पकडतो. आपला हात सिंहाच्या तोंडात अडकला आहे हे पाहून पर्यटक तो हात सोडवण्याचा प्रयत्न करतो. सिंह या झटापटीत त्याला सोडतो पण त्याच्या बोटाचा लचका तोडूनच.

सिंहाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल झाला आहे. तसंच सिंहाशी मस्ती करणं कसं अंगाशी येऊ शकतं हेदेखील या पर्यटकाला समजलं आहे. त्याला या निमित्ताने जन्माची अद्दल घडली आहे असंच म्हणता येईल.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in