Mumbai Tak /बातम्या / Viral : नवऱ्यानं सिक्रेट ठेवलं… घटस्फोटानंतर बायको बनली ‘मालामाल’
बातम्या शहर-खबरबात

Viral : नवऱ्यानं सिक्रेट ठेवलं… घटस्फोटानंतर बायको बनली ‘मालामाल’

Viral news of divorce case :

एखादी गोष्ट खोटी सांगताना ती आज न् उद्या अंगलट येऊ नये याचा विचार करुनच सांगावी लागते. अन्यथा त्या खोटं बोलल्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला असून एक खोटं बोलल्यामुळे पतीला आपली ६० टक्के संपत्ती पत्नीच्या नावे करावी लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला पत्नीचाही तो हक्क असल्यामुळे पतीसाठी वाटणारी सहानुभूती काहीशी कमी होते. (Wife got 60% of the husband’s property as a result of divorce in China)

नेमकं काय घडलं?

चीनमधील ‘बिजींग डेली’च्या बातमीनुसार पती ली ने आणि पत्नी झांग से या दोघांमध्ये खडाजंगी झाली. यानंतर दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान पतीने न्यायालयाला सांगितले की, माझ्याकडे फक्त 12 लाख रुपयांची ठेव आहेत.

परंतु, झांग से हिने कोर्टाला पती ली ने याच्या संपत्तीची चौकशी करण्याची विनंती केली. त्याच्या मालमत्तेची तपासणी केली असता, त्यांचं वार्षिक उत्पन्न साडेतीन कोटी रुपयांहून अधिक असल्याचं आढळून आलं. तसंच घटस्फोटाच्या प्रक्रियेपूर्वीच ली ने त्याच्या खात्यातून पैसे काढल्याचं आढळून आलं.

Old Pension Scheme : जुनी पेन्शन सुरू होणार? मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

यानंतर घटस्फोटाच्या निकालात पत्नीला पतीच्या मालमत्तेपैकी ६०% रक्कम मिळाली. चीनची राजधानी बीजिंगमध्ये उघडकीस आलेले घटस्फोटाचे हे विचित्र प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहे.

Uddhav Thackeray यांना भिडणं भिडेंना भोवलं; हायकोर्टानं ठोठावला मोठा दंड

वास्तविक, ली ने हे सर्व घटस्फोटाच्या बदल्यात त्याला आपल्या पत्नीला कमी पैसे द्यावे लागावेत म्हणून केलं होतं. मात्र घटस्फोटानंतर ६० टक्के त्याला पत्नीला द्यावी लागली. पण घटस्फोटानंतर ली ने झांग से ला भरपाई म्हणून एकूण किती रक्कम दिली, ही माहिती उघड होऊ शकली नाही. पण, या घटनेची चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर खूप चर्चा होत आहे.

चीनमध्ये घटस्फोटाच्या कायद्याबाबत मोठा बदल झाला आहे. यामध्ये घटस्फोटापूर्वी जोडप्याची मालमत्ता तपासली जाते. रिपोर्टनुसार, याआधी चीनमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये अनेकदा लोकं त्यांच्या मालमत्तेची माहिती लपवत असत. या व्हायरल घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव