माझी ओळख शिवरायांच्या विचारांशी हाच माझा खरा ब्रांड-संभाजीराजे छत्रपती
अनेक शिवभक्त कानाकोपऱ्यातून रायगडावर येत असतात. या आणि मागच्यावर्षी अनेक शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर येता आलं नाही. याचं निश्चित वाईट वाटतं असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. यावेळी संभाजीराजेंना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कायम ब्रांडेड कपडे आणि कपड्यांमध्ये पाहिलं जातं.. त्याबद्दल काय सांगाल? यावर क्षणाचाही विलंब न करता संभाजीराजे म्हणाले की छत्रपती शिवराय आणि […]
ADVERTISEMENT

अनेक शिवभक्त कानाकोपऱ्यातून रायगडावर येत असतात. या आणि मागच्यावर्षी अनेक शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर येता आलं नाही. याचं निश्चित वाईट वाटतं असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. यावेळी संभाजीराजेंना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कायम ब्रांडेड कपडे आणि कपड्यांमध्ये पाहिलं जातं.. त्याबद्दल काय सांगाल? यावर क्षणाचाही विलंब न करता संभाजीराजे म्हणाले की छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळेच माझी ओळख आहे माझ्यासाठी शिवराय आणि शाहू महाराज यांच्या विचारांमुळे जी माझी ओळख आहे तोच माझ्यासाठी ब्रांड आहे. बाकी इतर कोणताही ब्रांड मी मानत नाही असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार आहे. दरवर्षी हा सोहळा थाटात साजरा होतो. मात्र यावेळी हा सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने हा सोहळा साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो आहे. यावर्षी आता संभाजीराजे छत्रपती हे रायगडावर पोहचले आहेत. ते आज तिथे मुक्काम करणार आहेत. मराठा आरक्षणामुळे संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच चर्चेत आहेत.
मराठा आरक्षण रद्द, जाणून घ्या खासदार संभाजीराजे यांची नेमकी प्रतिक्रिया