आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाताय?; थांबा! आधी नियम तर वाचा…

मुंबई तक

– गणेश जाधव गणेशोत्सवानंतर वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रीच्या काळातील भक्तिमय वातावरण असते, तर महाराष्ट्रातील विविध देवींच्या दर्शनासाठीही लोक घराबाहेर पडतात. मात्र, गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– गणेश जाधव

गणेशोत्सवानंतर वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रीच्या काळातील भक्तिमय वातावरण असते, तर महाराष्ट्रातील विविध देवींच्या दर्शनासाठीही लोक घराबाहेर पडतात. मात्र, गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, तर नवरात्र काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापूर येथे संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे या 3 दिवसात एकही वाहन वा भाविकाला जिल्ह्यात येऊ दिलं जाणार नाही.

पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस, असं तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp