मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या दोन चुकांमुळे USSR चे झाले होते 15 तुकडे…
सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. गोर्बाचेव्ह बराच काळ आजाराशी झुंज देत होते. गोर्बाचेव्ह तेच अध्यक्ष आहेत ज्यांनी रक्त न सांडता शीतयुद्ध संपवले होते. दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध अनेक वर्ष सुरू होते. एकीकडे त्यांना शीतयुद्ध संपवण्याचा मानही मिळाला तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनचे विघटन रोखू […]
ADVERTISEMENT

सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. गोर्बाचेव्ह बराच काळ आजाराशी झुंज देत होते. गोर्बाचेव्ह तेच अध्यक्ष आहेत ज्यांनी रक्त न सांडता शीतयुद्ध संपवले होते. दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध अनेक वर्ष सुरू होते. एकीकडे त्यांना शीतयुद्ध संपवण्याचा मानही मिळाला तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनचे विघटन रोखू न शकल्याने त्यांना टीका झाली होती. मिखाईल गोर्बाचेव्ह हे असे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांना सुधारणा करायची होती. परंतु प्रत्यक्षात ते स्वतःच्या सत्तेची कबर खोदत होते. गोर्बाचेव्ह यांच्यासमोरच सोव्हिएत युनियनचे विघटन झाले होते.
सोव्हिएत युनियनचा गौरवशाली इतिहास
तो सोव्हिएत युनियन, ज्याने अॅडॉल्फ हिटलरचा पराभव केला. तो सोव्हिएत युनियन ज्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी शीतयुद्ध करून अण्वस्त्रांच्या शर्यतीत भाग घेतला. तो सोव्हिएत युनियन, ज्याने पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. अंतराळात जाणारा पहिला मानवही सोव्हिएत युनियनचा होता. त्याचे नाव होते युरी गागारिन. एकेकाळी सोव्हिएत युनियन सर्वच बाबतीत पुढे होते. पण गोर्बाचेव्ह यांच्या नजरेसमोर सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून 15 देश निर्माण झाले.
सोव्हिएत युनियन फुटले आणि तयार झाले हे 15 देश
25 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियन फुटले. 15 नवीन देश तयार झाले – आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकदा म्हणाले होते, सोव्हिएत युनियनच्या नावावर ‘ऐतिहासिक रशिया’चे विघटन झाले होते. आपण पूर्णपणे वेगळ्या देशात बदललो आणि आपल्या पूर्वजांनी मागच्या हजारो वर्षात जे केले होते ते विसरुन गेलो.
गोर्बाचेव्ह: 1931 मध्ये जन्म, 1985 मध्ये झाले राष्ट्राध्यक्ष
1917 मध्ये रशियात बोल्शेविक क्रांती झाली. या क्रांतीने झार निकोलस II ला सत्तेतून काढून टाकले आणि रशियन साम्राज्याचा अंत झाला. कामगार आणि सैनिकांनी मिळून सोव्हिएतची स्थापना केली. सोव्हिएत हा रशियन शब्द आहे, ज्याचा अर्थ सभा किंवा परिषद असा होतो. 1917 मध्ये सोव्हिएत युनियनची स्थापना झाली.