उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची बैठक का बोलावली होती?, काय झाली चर्चा?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२२ ऑगस्ट) पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरण, चालू पावसाळी अधिवेशन आणि मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आमदारांशी चर्चा केली. बैठकीत झालेल्या चर्चेची आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२२ ऑगस्ट) पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरण, चालू पावसाळी अधिवेशन आणि मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आमदारांशी चर्चा केली. बैठकीत झालेल्या चर्चेची आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भास्कर जाधव काय म्हणाले?
मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. कोणत्या परिस्थितीत ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना सत्तेचा हव्यास नव्हता. खुर्चीचा कधीही लोभ नव्हता. त्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरीता, महिलांसाठी, पीडितांसाठी हे सरकार काय निर्णय घेत आहे. हे त्यांना जाणून घेण्यात औत्सुक्य होतं”, अशी माहिती भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर दिली.
‘तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या’; शिंदेंवर टीकेची तोफ, फडणवीसांना शिवसेनेचं आव्हान
“पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार जनतेची आणि शिवसेनेची भूमिका मांडताहेत का? याबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांकडून जाणून घेतली. आमच्याकडून राहिलेल्या उणीवा दूर करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं”, असं भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले.