“उपमुख्यमंत्री ‘होयबा’ अंध भक्त”, शिवसेनेनं (UBT) फडणवीसांवर डागली तोफ
Devendra fadnavis Vs Uddhav Thackeray, Maharashtra politics: “विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागलीये. त्याचबरोबर अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरून मित्रपक्षांवरनाही खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena ubt attacks Devendra […]
ADVERTISEMENT

Devendra fadnavis Vs Uddhav Thackeray, Maharashtra politics: “विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागलीये. त्याचबरोबर अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरून मित्रपक्षांवरनाही खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena ubt attacks Devendra fadnavis And Eknath shinde)
शिवसेनेनं (UBT) सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा निर्णय मोदी-शहा यांच्या सरकारने घेतला. विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली. कार्यालय मुंबईतच राहील व वस्त्रोद्योग खात्याचे आयुक्त यापुढे दिल्लीत बसतील. फडणवीस यांचे हे बोलणे फोल आहे. आयुक्तालयाचा अर्थ शेवटी काय असतो? आयुक्तच कार्यालयात नसेल ते कार्यालय व त्यातील शेपाचशे कर्मचाऱ्यांना काय महत्त्व?”, असा सवाल शिवसेनेनं (UBT) केला आहे.
Saamana Editorial : शिवसेनेचं (UBT) मित्रपक्षांवरही टीकास्त्र
“वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीमार्गे अहमदाबादेत हलविण्याचा हा डाव आहे. थेट गुजरातेत नेले तर संघर्ष होईल. त्यामुळे आयुक्तांना आधी दिल्लीत नेऊन बसवायचे व सर्व काही शांत झाले की, त्यांची रवानगी गुजरातेत करायची. यापेक्षा वेगळा डाव असूच शकत नाही, पण या महाराष्ट्राच्या नुकसानीवर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत व उपमुख्यमंत्री थातूरमातूर उत्तर देऊन पळ काढतात. विधानसभेत यावर अधिक आक्रमकपणे घेराबंदी करायला हवी होती. तसे घडलेले दिसत नाही”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) मित्रपक्षांनाही सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे ते माहिमचा दर्गा : राज ठाकरे काय म्हणाले?