UPSC Result : महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर राज्यात आली पहिली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

UPSC Result केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीही निकालात मुलींचा दबदबा पाहण्यास मिळतो आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत १३ वी रँक मिळवली आहे, महाराष्ट्रात प्रियंवदा पहिली आली आहे.

UPSC Civil Services Final Result 2021: नागरी सेवा परीक्षेत मुलींचाच डंका, अंतिम निकाल जाहीर

व्हीजेटीआय कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण प्रियंवदाने पूर्ण केलं आहे. त्यानंतर आयआयएम बंगळुरूतून तिने MBA पूर्ण केलं. भारतात प्रियंवदा म्हाडदळकर तेराव्या क्रमांकाने उतीर्म झाली आहे. प्रियंवदा मूळची रत्नागिरीची असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे. २०२० मध्ये प्रियंवदाने नोकरी सोडली आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात हे मोठं यश मिळवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रियंवदाला लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. प्रियंवदाचे वडील सरकारी नोकरीत होते, त्यांच्याकडूनच प्रियंवदाने शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा घेतली. २०२० ला तिने स्थिरस्थावर असलेली नोकरी सोडून UPSC ची परीक्षा दिली. त्यात तिला यश मिळालं नाही पण दुसऱ्या प्रयत्नात मात्र तिने यश मिळवलं.

माझ्या यशात माझ्या घरातल्यांचा, नवऱ्याचा आणि सासूचा मोठा वाटा आहे असं प्रियंवदाने म्हटलं आहे. वैयक्तिक माहिती आणि करंट अफेअर्स अशा दोन मुलाखती महत्त्वाच्या असतात. दोन्हीवर मी भर दिला. मुख्य परीक्षा दिल्यावर मी त्याचा दोन तीन महिने नीट अभ्यास केला असंही प्रियंवदाने सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

नियमित अभ्यास आणि भरपूर सराव यांच्या बळावर प्रियंवदानं यशाला गवसणी घातली. वैयक्तिक माहिती आणि चालू घडामोडी या दोन गोष्टी मुलाखतीत महत्त्वाच्या असतात. त्या दोन्हीवर प्रियंवदानं भर दिला. मुख्य परीक्षेनंतर याच गोष्टींचा प्रियंवदानं दोन ते तीन महिने अभ्यास केला. मुलाखतीत मुद्देसूद बोलावलं लागतं. त्यावर प्रियंवदानं विशेष मेहनत घेतली. आपल्या यशात कुटुंबीयांचा, नवऱ्याचा आणि सासरच्या मंडळींचा मोठा वाटा असल्याचं प्रियंवदानं सांगितलं.

ADVERTISEMENT

UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021 असा पाहता येईल:

  • सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

  • आता तुम्हाला होम पेजवर UPSC नागरी सेवा निकाल 2021 – अंतिम निकालाची लिंक दिसेल.

  • येथे तुम्हाला निवडलेल्या उमेदवारांच्या नावांसह एक PDF फाइल दिसेल.

  • आता तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता आणि संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊ शकता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT