बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी, मग वारीलाच विरोध का?
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सरकारने मुंबईसह अमरावती, अकोला, बुलडाणा अशा महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. पुणे शहरातही प्रशासनाने संचारबंदीचे नियम लागू केले आहेत. प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपुरात जिल्हा प्रशासनाने माघ वारीला परवानगी नाकारली आहे. परंतू शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते…राजकीय पक्षांच्या मेळाव्यां गर्दी होते…ही गर्दी चालते मग वारीलाच विरोध […]
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सरकारने मुंबईसह अमरावती, अकोला, बुलडाणा अशा महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. पुणे शहरातही प्रशासनाने संचारबंदीचे नियम लागू केले आहेत. प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपुरात जिल्हा प्रशासनाने माघ वारीला परवानगी नाकारली आहे. परंतू शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते…राजकीय पक्षांच्या मेळाव्यां गर्दी होते…ही गर्दी चालते मग वारीलाच विरोध का?? असा सवाल वारकरी नेते ह.भ.प. बंडातात्या कराकडकर यांनी सरकारला विचारला आहे.
माघी वारीसाठी पंढरपुरातील मठामठांमध्ये वारकरी दाखल झाले आहेत. परंतू पोलीस प्रशासन या वारकऱ्यांना मठाबाहेर काढत असून त्यांनी असा प्रयत्न करु नये असं कराडकर म्हणाले आहेत. वारकरी संतापेल असं कोणतही पाऊल शासनाने उचलू नये इसा इशारा बंडातात्यांनी दिला. उद्या आम्ही वारकऱ्यांनी जर पंढरपुरात एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर शासनाच्या अंगलट येईल असा इशारा कराडकरांनी दिला आहे.
सध्याच्या घडीला लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतू पंचमी, षष्ठीपासून प्रत्येक वारकरी मठात येऊन राहत आहेत. त्या वारकऱ्यांना जर पोलीस हुसकावून लावत असतील तर ते योग्य नाही. कोरोनाच्या काळात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे यात काही वादच नाही पण संचारबंदीच करायची होती तर पंचमीपासून वारकऱ्यांना पंढरपुरात येऊ द्यायचं नव्हतं. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जिल्हा प्रशासनाने धार्मिक उत्सवांना परवानगी नाकारली आहे.