बदलापूर शाळा प्रकरणात झालेली कारवाई

मुंबई तक

बदलापूर प्रकरणात तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये बलात्कार झाला आहे, ज्यामुळे नागरिकांना संताप आले आहेत.

ADVERTISEMENT

Google CTA

माणुसकीला काळीमा फासणारी घटना बदलापूरमध्ये घडली आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेमध्ये बलात्कार झाला आहे. स्थानिक आमदारांनी या प्रकरणाची दखल घेतली नसल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकांनी रेल रोको करून आंदोलन केले. त्यावेळी हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करून पोलिसांवरही दगडफेक केली आहे. या घटना रेल्वे सेवेला फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूरमध्ये आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.