यापुढे नेतृत्व आदित्य ठाकरेच करणार? संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई : शिवनेतेली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाचे दोन तुकडे झाले. शिंदे गट – ठाकरे गट वेगळे झाले. या दरम्यान शिंदे गटाचा ठपका होतो तो ठाकरे घराण्यातील घराणेशाहीवर. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे पक्षात सक्रिय होऊन पक्षाचं नेतृत्व करत असल्याचा काही नेत्यांचा दावा होता. मात्र आता इथून पुढे पक्षाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरे हेच करणार […]

social share
google news

मुंबई : शिवनेतेली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाचे दोन तुकडे झाले. शिंदे गट – ठाकरे गट वेगळे झाले. या दरम्यान शिंदे गटाचा ठपका होतो तो ठाकरे घराण्यातील घराणेशाहीवर. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे पक्षात सक्रिय होऊन पक्षाचं नेतृत्व करत असल्याचा काही नेत्यांचा दावा होता. मात्र आता इथून पुढे पक्षाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरे हेच करणार असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिले. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये बोलत होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का? की यापुढील मार्ग महाविकास आघाडीचा असणार आहे? असा सवाल विचारण्यात आला. याच्या उत्तरात राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव कुठेही घेतलं नाही.

राऊत म्हणाले, यापुढील मार्ग हा महाविकास आघाडीचा आहे. आज राहुल गांधी-आदित्य ठाकरे एकत्र चालत आहेत. ही आजच्या काळातील दांडी यात्रा आहे. महात्मा गांधीही देशभर चालले होते. त्यानंतर देश जागा झाला. ही तरुण मुलं आहेत. त्यांच्यासोबत आज तरुण वर्ग चालतं आहे. तरुण वर्गाला या यात्रेचं आकर्षण आहे.

हे वाचलं का?

तसंच आदित्य ठाकरे यांचा स्वभाव मी जाणतो. ते आमचे तरुण नेते आहेत. ते आज राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत, याचा अर्थ पुन्हा मागे फिरण्यासाठी नाही. ते पुढे चालले आहेत. मागे फिरुन परत दगा देणं ही त्यांची किंवा आमची भूमिका नाही. वाईट काळामध्ये आम्ही एकत्र आहोत, असं म्हणतं त्यांनी यापुढे महाविकास आघाडी सोबतच राहणार आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राहणार असे स्पष्ट संकेत दिले.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी :

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT